Shard Pawar | चर्चेला उधाण… देशभरातील सर्वपक्षीय ’17 खासदार’ बारामतीच्या दौऱ्यावर

बारामतीतील विकास कामाची पाहणी करण्यात आलेल्या खासदारांमध्ये विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे. . यामध्ये भाजपचे 5 तर विविध पक्षातील 12 खासदारांचा समावेश आहे. यावेळी या खासदारांनी बारामतीतल्या सर्व संस्थांना भेट देत केली विकासकामांची पाहणी केली. यामध्ये शिवकुमार उदासी, निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, सीएम रमेश या भाजप खासदारांचा समावेश आहे.

Shard Pawar | चर्चेला उधाण... देशभरातील सर्वपक्षीय '17 खासदार' बारामतीच्या दौऱ्यावर
सर्वपक्षीय 12 खासदार शरद पवारांच्या भेटीला बारामतीत
Follow us
| Updated on: Mar 27, 2022 | 11:55 AM

नविद पठाण, टीव्ही9 मराठी, बारामती, पुणे – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP Sharad Pawar) यांच्या भेटीसाठी देशातील विविध पक्षाचे 12 खासदार आणि काही उद्योगती बारामतीत आले आहेत. बारामतीतील विकास कामाच्या पाहणीसाठीचा (Development work)हा खासगी दौरा असल्याचे सांगितले जात आहे. मात्र यामुळे राजकीय चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी दिलेल्या आमंत्रणावरून हे सर्वजण बारामतीत आल्याचे सांगण्यात येत आहे. बारामतीतील विविध विकास कामे,बारामतीच्या नियोजनबद्ध विकास आराखड्याची हे खासदार पाहणी करत आहेत. बारामतीतील औद्योगिक वसाहतीतील विविध कंपन्या, महिला सक्षमीकरण, शेतीविषयक विविध प्रचार व प्रसार तंत्रज्ञान, शैक्षणिक विकास, साखर उद्योग अशा विविध बाबींची पाहणी हे खासदार करत आहे. आज सायंकाळपर्यंत हा पाहणी दौरा सुरु राहणार आहे. बारामती (Baramati) विमानतळावर त्यांचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.

‘या’ खासदारांचा समावेश

बारामतीतील विकास कामाची पाहणी करण्यात आलेल्या खासदारांमध्ये विविध पक्षाच्या खासदारांचा समावेश आहे.   यामध्ये भाजपचे 5  तर विविध पक्षातील 12  खासदारांचा समावेश आहे. यावेळी या खासदारांनी बारामतीतल्या सर्व संस्थांना भेट देत केली विकासकामांची पाहणी केली. यामध्ये शिवकुमार उदासी, निशिकांत दुबे, दुष्यंत सिंग, सीएम रमेश या भाजप खासदारांचा समावेश आहे. तर सौगता रॉय (तृणमूल काँग्रेस), लवू कृष्णा देवरियालू (युवजन श्रमिक), रितेश पांडे (बसपा), विवेक गुप्ता (तृणमूल काँग्रेस) हे इतर चार खासदार आणि काही उद्योगतींचा समावेश आहे. दरम्यान हा अभ्यास दौरा असला तरी या दौऱ्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

‘या’ ठिकाणी दिल्या भेटी

दौऱ्यासाठी बारामतीत उपस्थितत असलेल्या खासदारांनी आपल्या दौऱ्यामध्ये फेरेरो या आंतरराष्ट्रीय चॉकलेट कंपनीला भेट दिली आहे. याबरोबरच बारामतीत महिलांनी बांधलेल्या टेक्सटाइल पार्कला भेट देत तेथील महिलांच्या सोबत संवाद साधला आहे. शिक्षण संकुल विद्या प्रतिष्ठानलाही भेट देण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार हे तिघेही स्वतः उपस्थित राहत विविध विकास कामांची माहिती देताना दिसून आले आहे.

वसईमध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; तरुणाला बेदम मारहाण

PBKS vs RCB : आता कर्णधार नाही, तर फलंदाज! नवं पर्व, नवं लक्ष्य..! IPL 2022मध्ये काय चमत्कार करणार Virat Kohli?

उन्हाळी सुट्यांमध्ये पुणे, शिर्डी, कोल्हापूरमधून विमान उड्डाणांची संख्या वाढणार

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.