Amol Kolhe : आता वय झालंय, म्हणत हसून उत्तर देणाऱ्या अन् नित्यनेमानं शिवाईदेवीचं दर्शन घेणाऱ्या ‘या’ आजीबाईचं अमोल कोल्हेंनीही केलं कौतुक

शहाजीराजांनी 1629मध्ये राजमाता जिजाऊ यांना बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. याच गडावरील शिवाईदेवीवर जिजाऊंची श्रद्धा होती. यातूनच त्यांनी छत्रपती शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवले होते.

Amol Kolhe : आता वय झालंय, म्हणत हसून उत्तर देणाऱ्या अन् नित्यनेमानं शिवाईदेवीचं दर्शन घेणाऱ्या 'या' आजीबाईचं अमोल कोल्हेंनीही केलं कौतुक
भामाबाई ताजणे यांच्यासह डॉ. अमोल कोल्हेImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 12:02 PM

पुणे : ‘आता वय झालंय’ असे म्हणत हसून सर्व समस्यांना तोंड देणाऱ्या आणि आपल्या उत्साहाने तरुणांनाही लाजवेल असे उदाहरण ठेवणाऱ्या आजीबाई म्हणजे भामाबाई ताजणे (Bhamabai Tajne)… वय झाले असूनही या आजीबाई मोठ्या उत्साहात जुन्नरमधील शिवाईदेवीचे नित्यनेमाने दर्शन घेतात. विशेष म्हणजे या आजीबाईंना मणक्याचा त्रास आहे. असे असूनही शिवनेरी गडावर शिवाईदेवीच्या (Shivai devi) दर्शनाला पायऱ्यांवरून त्या चालत चालत जातात. त्यांच्या या उत्साहाने खासदार डॉ. अमोल कोल्हे हेदेखील (Amol Kolhe) प्रभावित झाले. त्यांना स्वत: या आजीबाईंना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली, त्यांचे कौतुक केले. त्यासोबतच जो काही मणक्याचा आजार आहे, त्याच्या उपचारासंबंधी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले. त्याचबरोबर त्यांच्या लेखाचेही त्यांनी कौतुक केले आहे.

काय म्हणाले अमोल कोल्हे?

ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवरायांचे नामकरण करण्यात आले, त्या आई शिवाईची रोज सेवा करणाऱ्या भामाबाईंना फोन करून मणक्याच्या त्रासाबद्दल विचारपूस केली, तर ‘आता वय झालंय’ म्हणत त्यांनी चक्क हसून उत्तर दिले! त्यांची सकारात्मकता मला ऊर्जा देऊन गेली. त्यांना मी सर्वतोपरी मदत करणार आहे, अशा आशयाचे ट्विट डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे. त्यासोबतच त्यांनी भामाबाई ताजणे यांच्याशी साधलेला संवाददेखील ट्विट केला आहे. त्यांच्यासंबंधी आलेल्या लेखाबद्दलही त्यांनी आजींचे कौतुक केला आहे. दरम्यान, आजीला मदत करत आहात, मात्र गडाची दुरवस्था झाली आहे, त्यावरही काहीतरी करावे, अशी मागणी होत आहे.

हे सुद्धा वाचा

काय केलं ट्विट?

शिवाई देवीविषयी…

शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर राजमाता जिजाबाई यांच्या पूजेतील गडदेवता म्हणजे शिवाईदेवी… शहाजीराजांनी 1629मध्ये राजमाता जिजाऊ यांना बाळंतपणासाठी शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. याच गडावरील शिवाईदेवीवर जिजाऊंची श्रद्धा होती. यातूनच त्यांनी छत्रपती शिवरायांचे नाव शिवाजी असे ठेवले होते. डोंगरकड्याच्या पाषाणात मोठ्या दगडी घुमटामध्येच शिवाई देवीची मूर्ती आणि तांदळा स्थापन करण्यात आलेला होता. दरम्यान, 1935मध्ये याठिकाणी नव्याने मूर्ती आणि तांदळा घडविण्यात आला आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.