Anand Dave : पदाधिकारी शरद पवारांचं ऐकत नाहीत का? आनंद दवेंचा पुण्यात सवाल; जातीयवादप्रश्नी जितेंद्र आव्हाडांवर टीका

राष्ट्रवादी आणि जातीयता हा वाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र ब्राह्मण महासंघाला खात्री होती, की राष्ट्रवादी जातीय राजकारण सोडणार नाही, म्हणूनच आम्ही ती भेट नाकारली होती, अशी टीका आनंद दवे यांनी केली आहे.

Anand Dave : पदाधिकारी शरद पवारांचं ऐकत नाहीत का? आनंद दवेंचा पुण्यात सवाल; जातीयवादप्रश्नी जितेंद्र आव्हाडांवर टीका
जातीयवादप्रश्नी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करताना आनंद दवेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 3:42 PM

पुणे : या राष्ट्रवादीचे (NCP) करायचे काय? पदाधिकारी शरद पवार यांचे ऐकत नाहीत का, असा सवाल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केला आहे. ते पुण्यात बोलत होते. आम्ही जातीयवादी नाही, आम्ही सकारात्मक राजकारण करतो, असे पवार साहेबांनी पुण्यात परवा आम्ही न गेलेल्या ब्राह्मण बैठकीत सांगितले. तशा सूचना पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असेदेखील सर्वांसमोर मीडियाला सांगितले. ब्राह्मण महासंघाला खात्री होती, की राष्ट्रवादी जातीय राजकारण सोडणार नाही, म्हणूनच आम्ही ती भेट नाकारली होती, अशी टीका आनंद दवे यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे (Babasaheb Purandare) यांच्यावर केलेल्या टीकेचाही आनंद दवे यांनी समाचार घेतला आहे. यावरूनच त्यांनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले आहे.

‘राष्ट्रवादीवर टीका’

राष्ट्रवादी आणि जातीयता हा वाद मागील काही दिवसांपासून सुरू आहे. राज ठाकरे यांनी याची सुरुवात केली. एकीकडे राष्ट्रवादी विशेषत: शरद पवार जात मानत नसल्याचे विविध पक्षांनी सांगितले तर दुसरीकडे राज ठाकरेंसारख्या नेत्यांनी मात्र यावर तोंडसुख घेणे सुरूच ठेवले. त्यातच शरद पवार यांनी ब्राह्मण समाजाची बैठक बोलावली होती. काही ब्राह्मण संघटना मात्र या बैठकीला अनुपस्थित होत्या. आनंद दवे यांचीही संघटना यात सहभागी झाली नव्हती. त्यावर ते म्हणतात, की राष्ट्रवादी जातीयता सोडणार नाही, याची खात्री असल्यामुळेच या बैठकीला गेलो नाही. जितेंद्र आव्हाडांवरही त्यांनी टीका केली.

हे सुद्धा वाचा

‘यांना पुरंदरेंचे पत्र मान्य नाही’

काल पुण्यात जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा पक्षाचे संस्कार दाखवले आणि स्वर्गीय बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका केली. यांना ना बाबासाहेब पुरंदरे यांचे पत्र मान्य आहे, ना ऑक्सफर्डचे, अशी टीका करत यांना जेम्स लेनचे स्पष्टीकरण मान्य नाही तसेच खरा इतिहासदेखील मान्य नाही. यांना हवे आहे फक्त जातीय तेढ आणि द्वेषाचे राजकारण, असा हल्लाबोल आनंद दवे यांनी केला आहे.

काय म्हणाले आनंद दवे?

काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड?

माणूस मेल्यानंतर सगळे काही संपते. तो गेल्यानंतर जेम्स लेन जागा होतो. एक इतिहासकार बदनाम करून गेला. 20 वर्षे कोणीही यावर बोलले नाही. तो अमेरिकेतून मुलाखत देतो. ही माहिती त्याला कुणी दिली. ती जी माहिती आहे, ती बाबासाहेब पुरंदरे यांनीच पुस्तकात लिहून ठेवली आहे. हे जाहीरपणे बोलत आहे, असे आव्हाड म्हणाले होते. महाराष्ट्रात हिंदू-मुस्लीम वाद याच शिवचरित्राने केला, असा घणाघात काल जितेंद्र आव्हाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर केला होता. तसेच पुरंदरे यांनी काळा इतिहास लिहिला, असेही आव्हाड म्हणाले होते.

Non Stop LIVE Update
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.