AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा निर्णय! पुण्यात सोमवारपासून ‘नियंत्रित संचार’, विवाह सोहळे, हॉटेल, महाविद्यालांना बंधने; वाचा काय काय असतील निर्बंध

वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. (as COVID Cases Increase, pune Commissioner Issued guidelines)

मोठा निर्णय! पुण्यात सोमवारपासून 'नियंत्रित संचार', विवाह सोहळे, हॉटेल, महाविद्यालांना बंधने; वाचा काय काय असतील निर्बंध
Mumbai Corona Update
| Updated on: Feb 21, 2021 | 12:28 PM
Share

पुणे: वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात उद्या सोमवारपासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार आहे. पुण्यात उद्यापासून संचारबंदीचे नियम लागू करण्यात येणार असले तरी त्याला संचारबंदी न म्हणता नियंत्रित संचार असं संबोधण्यात येणार आहे. (as COVID Cases Increase, pune Commissioner Issued guidelines)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कौन्सिल हॉलमध्ये कोरोना नियंत्रण आढावा बैठक घेतली. या बैठकीला कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रमकुमार, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह जिल्ह्यातील सर्व खासदार उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यात नियंत्रित संचार लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांसाठी सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत.

28 फेब्रुवारीपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

पुणे जिल्ह्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासिका निम्म्या संख्येत सुरू ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. खासगी, राजकीय कार्यक्रमांसह विवाह सोहळ्याला 200 लोकांची उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे. तसेच विवाह सोहळ्यासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक असणार आहे. परवानगीसाठी सिंगल विंडो सिस्टिम सुरू करण्यात येणार आहे.

संचार बंदी

हॉटेल, लॉज, बार रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारसाठी उद्यापासून निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत इतरांसाठी नियंत्रित संचार बंदी लागू असणार आहे.

काय करणार?

पुणे जिल्हा कोरोनाच्या केसेस वाढण्याच्या बाबतीत राज्यात 12व्या क्रमांकावर आहे. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील हॉटस्पॉट शोधण्यात येणार असून कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यात येणार आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात येणार आहे. शिवया फ्रंट लाईन वर्करच्या लसीकरणाचे प्रमाणही वाढवण्यात येणार आहे. त्याशिवाय लोकसंवादातून कोरोना विषय जागृती करण्यावरही भर देण्यात येणार असल्याचं आयुक्त सौरभ राव यांनी सांगितलं. जिल्ह्यात हॉटस्पॉटच्या ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करण्यात येणार आहे. ससून रुग्णालयातील पायाभूत सुविधा वाढवण्यात येणार आहे. तसेच ससूनमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ देण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घेण्यात येत असलेल्या निर्णयांना जनतेची साथ लाभेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. (as COVID Cases Increase, pune Commissioner Issued guidelines)

संबंधित बातम्या:

LIVE | अमरावती शहरात 12 प्रतिबंधित क्षेत्र जाहीर, मनपा आयुक्तांकडून प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी

ठरलं ! मुख्यमंत्री महाराष्ट्राशी रात्री 7 वाजता बोलणार, लॉकडाऊनचा संभ्रमही दूर करणार?

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्यावर अखेर गुन्हा दाखल; कोरोनाचे नियम न पाळणे भोवले

(as COVID Cases Increase, pune Commissioner Issued guidelines)

मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....