AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayush Komkar Murder Case: पोलिसांनी बंडू आंदेकरची जिरवली, थेट गुढघ्यावर बसवले अन्

पुण्यात काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आज पुण्यातील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी पोलिसांनी आरोपी बंडू आंदेकरला गुढघ्यावर बसवले होते.

Ayush Komkar Murder Case: पोलिसांनी बंडू आंदेकरची जिरवली, थेट गुढघ्यावर बसवले अन्
Bandu Andekar
| Updated on: Sep 09, 2025 | 7:26 PM
Share

पुण्यात काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. आयुष गेल्या वर्षीच्या वनराज आंदेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आहे. आज पुण्यातील सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. आज या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी कोर्टात आरोपी बंडू आंदेकरला गुढघ्यावर बसवले होते. नेमकं काय घडलं याबाबत माहिती जाणून घेऊयात.

बंडू आंदोकर गुढघ्यावर

आयुष कोमकर हत्या प्रकरणातील 13 पैकी 8 आरोपींना आज पुण्यातील सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींमध्ये आयुषचे आजोबा बंडू आंदेकरचाही समावेश होता. आरोपी कोर्टात हजर झाल्यानंतर त्यांना दोन गुढघ्यावर बसवले जाते. मात्र बंडू आंदेकर हा वयस्कर असल्याने त्याला दोन पायावर बसता येत नव्हते, त्यामुळे तो थेट मांडी घालून बसला होता. मात्र पुणे पोलिसांनी गुढघ्यावर बसायला सांगितले, त्यानंतर आंदेकरसह सर्व आरोपींना गुढघ्यावर बसवण्यात आले.

आम्हाला या प्रकरणात गोवलं जात आहे – आंदेकर

आज या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यावेळी बंडू आंदेकरने सांगितले की, ‘आम्हाला या प्रकरणात गोवलं जात आहे, हत्येच्या वेळी आम्ही केरळमध्ये होतो. मी माझ्या नातवाचा खून का करू? तो माझा वैरी नाही. वनराज अंदेकर नगरसेवक होता. तो युथ आईकोन होता. त्यामुळे त्याचा खून केला असावा.’ यावेळी आरोपांच्या वकिलांनीही त्यांचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.

आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी

पुणे पोलिसांनी कोर्टात युक्तिवाद करताना म्हटले की, आंदेकर कुटुंबातील सदस्यांनी कट रचून हत्या केली आहे. कारण अमन पठाण आणि यश पाटील यांनी येथे फक्त बंडू आणि विष्णू आंदेकरच अशा घोषणा दिल्या. अन्य आरोपींना अटक करण्यासाठी या 8 आरोपींकडून माहिती घ्यायची आहे. बंदुक कुठून आणली याचा तपास करायचा आहे. ज्यांनी हत्या केली त्याची कपडे जप्त करायचे आहे. हे टोळी युद्ध आहे त्यामुळे 7 दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी पोलिसांनी केली. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.