जन्मदात्यांनी दर्ग्याजवळ सोडलं, पोलिसांनी ममत्व जपलं, पुण्यात चिमुरडीच्या पालकांचा शोध सुरु

सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खराडीतील एका दर्ग्याजवळ दोन महिन्यांच्या चिमुरडीला तिच्या आई-वडिलांनी सोडून दिलं होतं. (Baby Pune Kharadi Mosque)

जन्मदात्यांनी दर्ग्याजवळ सोडलं, पोलिसांनी ममत्व जपलं, पुण्यात चिमुरडीच्या पालकांचा शोध सुरु
खराडीतील एका दर्ग्याजवळ दोन महिन्यांची चिमुरडी सापडली होती

पुणे : जन्मदात्या माता-पित्यानेच अवघ्या दोन महिन्यांच्या चिमुरडीला पुण्यातील दर्ग्यात सोडून दिले. बाळाची माहिती मिळताच अवघ्या काही मिनिटांमध्ये चंदननगर पोलिसांनी खराडी परिसरात धाव घेतली. चिमुरडीला ताब्यात घेऊन तिच्या आई-वडिलांचा शोध सुरु केला आहे. (Baby found near Pune Kharadi Mosque)

खराडीतील दर्ग्याजवळ चिमुरडी आढळली

दामिनी पथकासह महिला पोलीस उपनिरीक्षकाने चिमुरडीला पोलिस ठाण्यात आणले. चिमुकलीला बाटलीतून दूध पाजून महिलेने ममत्व जपले आहे. सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास खराडीतील एका दर्ग्याजवळ दोन महिन्यांच्या चिमुरडीला तिच्या आई-वडिलांनी सोडून दिलं होतं.

दामिनी पथकाकडून बाळाला ताब्यात

चंदननगर पोलीस ठाण्यातील एलआयबीचे कर्मचारी पांडुरंग नानेकर यांना याविषयी माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी दामिनी पथकाला ही माहिती दिली. त्यानंतर महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता काळे यांच्या मार्गदर्शनाखाली चंदननगर दामिनी मार्शल उज्ज्वला बनकर आणि सुवर्णा वाळके यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेउन बाळाला ताब्यात घेतले.

चिमुकलीच्या आई-वडिलांचा शोध सुरु

बाळाला पोलीस ठाण्यात आणून सुश्रुषा केली. त्यानंतर दूध पाजून दोन महिन्यांच्या चिमुरडीला आपलेसे केले. ही कामगिरी पांडुरंग नाणेकर, समीर शेख, संदीप पाटील यांच्या पथकाने केली. दरम्यान, बाळाला सोडून देणाऱ्या माता-पित्यांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक संगीता काळे यांनी दिली आहे. (Baby found near Pune Kharadi Mosque)

पुण्यातील ‘त्या’ घटनेच्या आठवणी ताज्या

पुण्याच्या चांदणी चौकातील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका झुडुपाखाली जून महिन्यात गोंडस बाळ सापडलं होतं. कानाला वारा लागू नये म्हणून बाळाच्या डोक्याला कानटोपी गुंडाळलेली होती. कपाळावर छानसा काळा टिळा होता. दृष्ट लागू नये म्हणून गालाला हलकासा काळा टिक्का लावलेला. सर्व तऱ्हेने सुरक्षित असलेले चार महिन्याचे बाळ एका झुडपाखाली ठेवले होते.

चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडून जाणाऱ्या पाषाणहृदयी आईला पोलिसांनी काही तासात अटक केली होती. पुण्यातील कोथरुड पोलिसांनी अवघ्या काही तासात महिलेला बेड्या ठोकल्या होत्या. महिला वारंवार चिडून घर सोडून जात असल्याची माहिती तिच्या पतीने दिली होती.

संबंधित बातम्या :

चार महिन्यांच्या बाळाला झुडपात सोडणारी पुण्याची पाषाणहृदयी आई अटकेत

डोंबिवलीच्या खाडीत 16 दिवसांपूर्वी चिमुकल्यांना सोडून गेलेली आई कुठेय?

(Baby found near Pune Kharadi Mosque)

Published On - 2:24 pm, Tue, 23 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI