बारामतीकर तरुणाच्या पाठीवर ‘साहेबां’चा पर्मनंट टॅटू, खुद्द शरद पवारांकडूनही कौतुक

बारामतीकर तरुणाच्या पाठीवर 'साहेबां'चा पर्मनंट टॅटू, खुद्द शरद पवारांकडूनही कौतुक
अक्षय साळवेने पाठीवर शरद पवारांचा टॅटू काढून घेतला

अक्षय साळवे असं टॅटू पाठीवर काढलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला. अक्षय हा मूळचा बारामती तालुक्यातील मेदड गावचा रहिवासी आहे.

नविद पठाण

| Edited By: अनिश बेंद्रे

Jul 12, 2021 | 8:41 AM

बारामती : आपल्या नेत्यावरील प्रेमापोटी कार्यकर्ते ‘वाट्टेल ते’ करायला तयार असतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर निस्सीम श्रद्धा असलेला असाच एक कार्यकर्ता पाहायला मिळत आहे. अक्षय साळवे (Akshay Salve) नावाच्या या समर्थकाने चक्क आपल्या शरीरावर शरद पवार यांचा चेहरा असलेला टॅटू काढला आहे. अक्षयच्या पाठीवरील टॅटू पाहून खुद्द पवारांनीही त्याचं कौतुक केलं.

कोण आहे हा चाहता?

प्रेमापोटी अक्षयने आपल्या संपूर्ण पाठीवर शरद पवार यांचा टॅटू काढला आहे. विशेष म्हणजे हा टॅटू पर्मनंट म्हणजेच कायमस्वरुपी आहे. अक्षय साळवे असं टॅटू पाठीवर काढलेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. संदीप जोशी या कलाकाराने हा टॅटू अक्षयच्या पाठीवर काढला. अक्षय हा मूळचा बारामती तालुक्यातील मेदड गावचा रहिवासी आहे. तो सध्या मुंबईत व्यवसायानिमित्त स्थायिक झालेला आहे.

पावसातील सभेने भारावून गेला

विधानसभा निवडणुकांच्या वेळी साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी प्रचार सभा घेतली होती. या सभेत पाऊस आल्यानंतरही शरद पवारांनी पावसात भिजत सुरु ठेवलेले भाषण प्रचंड गाजले होते. यामुळे अनेक जण प्रभावित झाले होते. हे दृश्य पाहून अक्षयही भारावून गेला होता. त्याच वेळी अक्षयने मुंबईत हा टॅटू काढून घेतला होता.

दीड वर्षांनी अखेर पवारांची भेट

आपल्या पाठीवरील ही कारागिरी खुद्द शरद पवार यांनी पाहावी, अशी अक्षयची मनापासून इच्छा होती. गेली दीड वर्ष तो शरद पवार यांच्या भेटीच्या प्रतीक्षेत होता. अखेर रविवारी ही संधी चालून आली. अक्षयने शरद पवारांची काल भेट घेतली. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अक्षयने शरद पवारांना आपल्या पाठीवर काढेलला टॅटू दाखवला. यावेळी शरद पवारांनीही अक्षयचे कौतुक केले

संबंधित बातम्या :

Sharad Pawar Satara Rain Speech | भरपावसातील शरद पवारांच्या सभेची वर्षपूर्ती, राष्ट्रवादीने भाजपला पुन्हा डिवचलं

महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही घडेल; जो बायडन यांच्या ‘सातारा स्टाईल’ भाषणावर रोहित पवारांचं वक्तव्य

(Baramati Akshay Salve makes Tattoo on back Sharad Pawar appreciates)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें