इंधन दरवाढीचा मोठा फटका; रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला

शहरातील रिक्षा प्रवास महागला आहे. येत्या 22 नोंव्हेबरपासून नवीन दरवाढ लागू होईल. आता रिक्षात बसताच नवीन दरानुसार 21 रुपयांचा मीटर पडेल. पुढील प्रत्येक किलोमीटसाठी 14 रुपये मोजावे लागतील.

इंधन दरवाढीचा मोठा फटका; रिक्षा प्रवास तीन रुपयांनी महागला
Auto Rikshaw

पुणे-  इंधन दरवाढीचा मोठा फटका सर्वसामान्य बसत आहे. पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्यामुळं अनेकांना दुचाकी वाहन वापराने परवडेनासे झाले आहे . त्यातच आता शहरातील रिक्षा प्रवास महागला आहे. येत्या 22 नोंव्हेबरपासून नवीन दरवाढ लागू होईल. आता रिक्षात बसताच नवीन दरानुसार 21 रुपयांचा मीटर पडेल. पुढील प्रत्येक किलोमीटसाठी 14 रुपये (पहिल्या दरापेक्षा अतिरिक्त 1 रुपया 69 पैसे) मोजावे लागतील. यापूर्वी मीटर 18 रुपयांनी सुरू होत होता.

असा असेल दर

जिल्हाधिकारी कार्यालयात प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड व बारामती येथे बैठक पार पडली. सध्याच्या १८ रुपये भाडेदरात 3 रुपयांनी वाढ करून ती 21 रुपये करण्यात आली. पुढील प्रवासासाठी सध्याच्या 12.31 भाडेदरात 1 रुपया 69 पैसे वाढ करून ती 14 रुपये करण्यात आली. महापालिका क्षेत्रात रात्री 12  ते पहाटे 5 पर्यंत 25 टक्के अतिरिक्त भाडेदर आकारला जाणार आहे इतर ग्रामीण भागासाठी रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत 40  टक्के अतिरिक्त भाडेदर लागू राहणार आहे. तसेच प्रवाशांसमवेत असणाऱ्या सामानासाठी 60 बाय 40 सेमी आकाराच्या किंवा त्यापेक्षा मोठ्या नगासाठी 3 रुपये शुल्क लागू राहणार आहे

मीटर पुन:प्रमाणिकरण  करावं लागणार 

दरवाढीनुसार रिक्षाधारकांना मीटर पुन:प्रमाणिकरण करण्यासाठी 31 डिसेंबर, 2022 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जे रिक्षाधारक बदल मीटरमध्ये करून घेतील त्यांनाच ग्राहकांकडून नवीन दर घेता येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. अजित शिंदे यांनी सांगितले. मुदतीत पुनः प्रमाणिकरण न करणाऱ्यांना मुदत समाप्तीनंतर प्रत्येक दिवसाला 50 रुपये दंड द्यावा लागेल.

संबंधित बातम्या:

Kulbhushan Jadhav: अखेर, कुलभूषण जाधव यांना अपील करण्याचा अधिकार मिळाला, पाकिस्तानच्या संसदेत विधेयक मंजूर

अखेर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग फरार घोषित; … तर संपत्तीही जप्त होणार

एसटी कर्मचारी असो वा आमदार दोघेही जनसेवक, मग एकाची दिवाळी तर दुसऱ्याच्या नशिबी शिमगा का?

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI