नाकात ऑक्सिजन नळ्या घालून अखेरची प्रचारसभा, 40 वर्षांची यशस्वी राजकीय कारकीर्द, कोण होते गिरीश बापट?

कसब्यातील निवडणूक जिंकल्यानंतर भाजपचे विरोधी उमेदवार रवींद्र धंगेकर आधी गिरीश बापट यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. यातूनच बापट यांच्या परिपक्व राजकारणाची कल्पना येते.

नाकात ऑक्सिजन नळ्या घालून अखेरची प्रचारसभा, 40 वर्षांची यशस्वी राजकीय कारकीर्द, कोण होते गिरीश बापट?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 29, 2023 | 12:55 PM

अभिजित पोते, पुणे : महाराष्ट्रातच नव्हे तर देशात गाजलेल्या कसबा पेठ  (Kasba Peth) पोट निवडणुकीतल्या भाजपच्या (BJP) प्रचारसभेतलं एक चित्र कुणीही विसरू शकणार नाही. अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त असूनही नाकात ऑक्सिजनच्या नळ्या घेऊन आलेले गिरीश बापट (Girish Bapat). भाजप उमेदवार हेमंत रासनेंच्या प्रचारार्थ उतरले अन् गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकारणात चर्चेचा विषय ठरले. भाजपवर यावरून तीव्र टीका झाली. पण गिरीश बापट हा राजकारण जगणारा, राजकारणातच जिवंत राहणारा खरा लढवय्या नेता आहे, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलं. आज पुण्यातील माजी खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर त्यांची राजकीय कारकीर्दीला आवर्जून उजाळा द्यायला हवा. राजकारणातही माणूसपण जपणारा नेता, अशी त्यांची ख्याती होती. कसब्यातील निवडणूक जिंकल्यानंतर  विरोधी उमेदवार रवींद्र धंगेकर आधी गिरीश बापट यांचे आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले. यातूनच बापट यांच्या परिपक्व राजकारणाची कल्पना येते.

कोण होते गिरीश बापट?

  •  गिरीश बापट यांचा जन्म तळेगाव दाभाडे येथे 3 सप्टेंबर 1950 रोजी झाला.
  •  टेल्को कंपनीत 1973 ला कर्मचारी म्हणून काम करत असताना कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
  •  1983 ला पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक म्हणून निवड.
  • . 1993 ला झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांचा पराभव.

  •  मात्र 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाचवेळा आमदार म्हणून विजयी.
  •  राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणून काम.
  • 2019 ला पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवड.
  • मात्र त्यानंतर दुर्धर आजाराने गिरीश बापट आजारी. मात्र आजारपणातही गिरीश बापट राजकारणात सक्रिय.
  • नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी व्हीलचेअर बसून आणि कृत्रिम श्वासोच्छ्वास घ्यावा लागत असताना देखील पक्षासाठी प्रचारात सक्रिय.
  • गुढीपाडव्यानिमित्त कसबा गणपतीसमोर गिरीश बापटांच्या खासदार निधीतून करण्यात आलेल्या विकास कामांच्या उद्घाटनाला गिरीश बापट यांच्याकडून कॉंग्रेसचे विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि त्यांचे भाजपमधील प्रतिद्वंद्वी हेमंत रासने यांना आमंत्रित करण्यात आले होते. हा सर्वसमावेशकपणा हेच गिरीश बापट यांच्या राजकारणाचे वैशिष्ट्य होते आणि चाळीस वर्षांच्या यशस्वी राजकीय कारकीर्दीचे रहस्य
Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.