AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारमधील काही मंत्री ओबीसींच्या मनात भीती घालण्याचं काम करतायत, गोपीचंद पडळकरांचा निशाणा

जे नेते या विषयात पडत आहेत त्यांना या गोष्टीचा राजकारण करायचं आहे," अशी खोचक टीकाही पडळकरांनी केली. (Gopichand Padalkar Comment On OBC Reservation)

राज्य सरकारमधील काही मंत्री ओबीसींच्या मनात भीती घालण्याचं काम करतायत, गोपीचंद पडळकरांचा निशाणा
| Updated on: Jan 24, 2021 | 10:01 PM
Share

पिंपरी चिंचवड : “राज्य सरकारमधील काही मंत्री ओबीसींच्या मनात भीती घालण्याचं काम करत आहेत. ते चुकीचं आहे आणि ओबीसी समाजानेसुद्धा घाबरायचं कारण नाही. तुमच्या आरक्षणाला धक्का लावायचा संबंध नाही,” अशी प्रतिक्रिया भाजप नेते आणि विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. (Gopichand Padalkar Comment On OBC Reservation)

“ओबीसींमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण तयार झालेले आहे. या राज्य सरकारमधील काही मंत्री आणि स्वत: राज्य सरकार ओबीसीबाबत गंभीर नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही सर्वांची भावना आहे. त्यांच्यात गरीब लोक आहेत, त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी सर्वांची भूमिका आहे. पण, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि लागणार नाही,” असेही गोपीचंद पडळकर म्हणाले.

“देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जो कायदा महाराष्ट्रात केला. तो ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता ते आरक्षण दिलेले आहे. तरीसुद्धा आम्हाला ओबीसीत जायचं आहे. अशा पद्धतीची स्टेटमेंट करतात. त्यामुळे ओबीसींच्या मनात प्रचंड प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. यामुळे राज्यसरकारची जबाबदारी आहे की ओबीसीच्या मनात ज्या शंका कुशंका निर्माण झाल्या आहेत. त्या वेळेत काढायला पाहिजेत. राज्यसरकार तशा पद्धतीने काढत नाही. राज्यसरकारमधील काही मंत्री ओबीसींच्या मानात भिती घालण्याच काम करत आहेत. ते चुकीचं आहे आणि ओबीसीने सुद्धा घाबरायच कारण नाही. तुमच्या आरक्षणाला धक्का लावायचा संबंध नाही,” असेही पडळकरांनी सांगितले. (Gopichand Padalkar Comment On OBC Reservation)

मोदींचा निर्णय शेतकरी हिताचा

“मुळात काँग्रेसने 2019 मध्ये जो जाहीरनामा केला त्यात ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत तेच केंद्र सरकार करत आहे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगबद्दल 2006 आणि 07 मध्येच निर्णय झाला आहे आणि या राज्यात कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चालू आहे. सोशल मीडियामध्ये बारामती ऍग्रोचं पोस्टर फिरताना दिसेल ते त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगमध्ये आहे. हरियाणा आणि पंजाबची परिस्थिती वेगळी आहे. त्या ठिकाणचे शेतकरी गहू आणि तांदूळ उत्पादक आहे. तो गहू आणि तांदूळ केंद्र सरकार 90 टक्के हमी भावाने खरेदी करतात. तिथल्या लोकांचा प्रश्न वेगळा आणि, ती परिस्थिती महाराष्ट्रात नाही,” अशी प्रतिक्रिया पडळकरांनी शेतकऱ्यांच्या मोर्चावर दिली.

“मी सदाभाऊ खोत आम्ही किसान यात्रा काढली. चार दिवसांमध्ये अनेक गावांत, तालुक्यात गेलो होतो. तेव्हा आम्हाला शेतकऱ्यांनी मोदींनी चुकीचा निर्णय घेतला आहे, असं म्हणायला हवं होतं. आम्ही अनेक शेतकऱ्यांना भेटलो, त्यांचा पक्ष कोणता आहे, हे माहीत नाही. त्यांनी सांगितलं आपल्या बाजूचा कायदा आहे. त्यामुळं आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूचे आहोत. मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला आहे तो एक लाख टक्के शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. ज्या लोकांना मोदी सरकारचा विरोध करायचा आहे. जे नेते या विषयात पडत आहेत त्यांना या गोष्टीचा राजकारण करायचं आहे,” अशी खोचक टीकाही पडळकरांनी केली.

सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं कोणीही ऐकत नाही

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या त्या फायलीचा विनयभंग केल्यासारखं झालेलं आहे. या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचे कोणी ऐकत नाही. त्यांचं वजन राहिलेलं नाही. त्यांचा दबावात कोणतेही अधिकारी नाहीत. त्यांना या प्रशासनामधील माहिती नाही. ही बाब अत्यंत गंभीर आहे,” अशी टीका पडळकरांनी केली. (Gopichand Padalkar Comment On OBC Reservation)

“मुख्यमंत्री आमच्या विरोधात असले तरी ही बाब गंभीर आहे. ज्याने कोणी भानगडी केल्यात त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. उद्या कोणीही फायलींवर खाडाखोड करेल. मुख्यमंत्र्यांचे आदेश डावलेल. त्यांचा वचक त्या सरकारमध्ये राहिलेला नाही. हे वेळोवेळी दिसून येतं आहे. त्यामुळे यावर एकदा मुख्यमंत्र्यांनी विचार करायला हवा,” असेही पडळकर म्हणाले.

राष्ट्रवादीत कसा प्रामाणिक हे दाखवण्याचा हा प्रयत्न

“काही लोकांना काहीतरी बोलून राष्ट्रवादीत स्थान बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुळात हे निवडणूक हरलेले आहेत. त्यांना कोण कशासाठी पैसे देईल, 100 कोटी हे गोळ्या बिस्कीट नाहीत, जे यांना देतील. त्यांना फ्रॉड करण्याची सवय लागलेली आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात असे मोठे आकडे येतात. ग्रामपंचायतमध्ये त्यांचा दारुण पराभव झालेला आहे. त्यामुळं काहीतरी स्टेटमेंट करून मी राष्ट्रवादीत कसा प्रामाणिक आहे. बाहेरचे लोक बोलवत असताना देखील मी गेलो नाही हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे. त्याचा खोट्या पद्धतीने बाऊ केला जातो आहे, त्यामुळं जास्त सिरीयस घेण्याची गरज नाही,” असे पडळकर आमदार शशिकांत शिंदेंच्या प्रकरणावर म्हणाले.

“भाजपाला लोकांचे काम करण्यासाठी सत्ता हवी असते. आज विश्वासघाताने विरोधात आहोत. याचा आम्हाला काही फरक नाही. आम्ही जनतेचे प्रश्न सरकारकडे मांडत आहोत, त्यांच्या मानगुटीवर बसून राज्याचे विरोधी पक्षनेते काम करून घेत आहेत. कोरोना, चक्रीवादळ, विदर्भातील महापूर, अतिवृष्टी, या सगळ्या विषयामध्ये विरोधी पक्षाच लोकांमध्ये गेला. ही सरकारची जबाबदारी असते. लोकांमध्ये जाण त्यांना विश्वास देणे. त्यांना मदत देणे ही सरकारची जबाबदारी आहे. मात्र, ते उशिरा गेले. विरोधी पक्ष पहिल्यांदा शेतकऱ्यांच्या बांधावर गेला. लोकांनी बहुमत दिले असले तरी विश्वासघाताने सत्तेत नाहीत. आम्ही लोकांच्या बाजूने काम करतोयेत, त्यामुळे सत्तेत रस नाही,” असेही पडळकर यांनी सांगितले. (Gopichand Padalkar Comment On OBC Reservation)

संबंधित बातम्या : 

VIDEO: दिंडोशीत क्रिकेटचा राजकीय डाव रंगला, आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर उर्मिलाची फटकेबाजी

Farmer Protest : मुंबईत ‘लाल वादळ’ घोंघावणार!, कसा असेल पोलीस बंदोबस्त?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.