VIDEO: दिंडोशीत क्रिकेटचा राजकीय डाव रंगला, आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर उर्मिलाची फटकेबाजी

दिंडोशीमध्ये क्रिकेटचा राजकीय डाव रंगल्याचा पाहायला मिळालं. या ठिकाणी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढवला.

  • गोविंद ठाकूर, टीव्ही 9 मराठी, मुंबई
  • Published On - 20:13 PM, 24 Jan 2021
VIDEO: दिंडोशीत क्रिकेटचा राजकीय डाव रंगला, आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर उर्मिलाची फटकेबाजी

मुंबई : दिंडोशीमध्ये क्रिकेटचा राजकीय डाव रंगल्याचा पाहायला मिळालं. या ठिकाणी अभिनेत्री उर्मिला मातोंडकरांनी आमदार सुनील प्रभूंच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करत उपस्थित खेळाडूंचा उत्साह वाढवला. तसेच त्यांना या स्पर्धेसाठी सदिच्छा दिल्या. दिंडोशी विधानसभा क्षेत्रात बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमत्त अंडरआर्म सर्कल क्रिकेट स्पर्धा ‘आमदार चषक 2021’ येथे आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात उर्मिला मातोंडकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत आमदार सुनील प्रभू देखील उपस्थित होते (Actress Urmila Matondkar play cricket in Dindoshi with MLA Sunil Prabhu).

उर्मिला मातोंडकर म्हणाल्या, “या ठिकाणी क्रिकेट खेळताना आणि पाहताना आयपीएल आणि सर्व एकत्र झाल्यासारखं वाटलं. एवढ्या कमी ओव्हरमध्ये इतकी मजा येईल, मजेशीर मॅच होईल असं मला वाटलं नव्हतं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वाचं अभिनंदन आणि आयोजकांचे खूप धन्यवाद. आमदार सुनील प्रभू यांनी गोलंदाजी करुन मला फलंदाज करुन टाकलं.”

यावेळी त्यांनी यापुढे भारतीय महिला क्रिकेट टीमने देखील इकडं एक अभिनेत्री, राजकारणीच नाही तर एक क्रिकेटर असल्याचंही लक्षात ठेवावं, असं म्हणत टोला लगावला. यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

‘शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात’

उर्मिला मातोंडकर यांनी यावेळी शेतकरी आंदोलनावरही भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “संपूर्ण महाराष्ट्रातून शेतकरी मुंबईत येत आहेत. त्यांचं स्वागत आहे. हा केवळ एका भागाचा मुद्दा नाहीये, त्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न लोकांपर्यंत जरुर पोहचेल. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण होवो हीच देवाकडे मागणं आहे.”

हेही वाचा :

वाचाळांमध्ये कृतीतून बोलणारा माणूस म्हणजे उद्धव ठाकरे : उर्मिला मातोंडकर

प्रबोधनकार ठाकरे भट भिक्षुकशाहीला नाकारणारे कडवे हिंदुत्ववादी : उर्मिला मातोंडकर

थोरांताना फोन करून परवानगी; काँग्रेसकडून लढताना वाचलेला निधी उर्मिलाकडून CM फंडात

व्हिडीओ पाहा :

Actress Urmila Matondkar play cricket in Dindoshi with MLA Sunil Prabhu