गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही, देशमुख धमक्या देत देतच गेले; चंद्रकांत पाटील कडाडले

ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशीप्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. (BJP state president Chandrakant Patil criticizes Dilip Walse Patil)

गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही, देशमुख धमक्या देत देतच गेले; चंद्रकांत पाटील कडाडले
चंद्रकांत पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 6:39 PM

पुणे: ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाची चौकशीप्रकरणी भाजप नेत्यांवर कारवाई करण्याचे संकेत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. त्यांच्या या इशाऱ्याची भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. खुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाहीत. अनिल देशमुखही धमक्या देत देत गेले, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. (BJP state president Chandrakant Patil criticizes Dilip Walse Patil)

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा इशारा दिला. महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे. त्यामुळेच सर्व काही केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोरोनाच्या काळात सत्ताधाऱ्यांनी असं राजकारण करणं योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी रोज खोटे आरोप करणं थांबवावं, असं सांगतानाच दिलीप वळसे पाटील तुम्ही कसल्या केसेस दाखल करताय. खुशाल गुन्हा दाखल करा. आम्ही घाबरत नाही. अनिल देशमुखही धमक्या देत देतच गेले, असं पाटील म्हणाले. दिलीप वळसे पाटील हे सौम्य वाटले होते. पण इंजेक्शन दिल्यावर तेही पुढे जात असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.

मोदींनी फोननंतरच बैठक घेतली

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोनवरूनच उपलब्ध झाले आहेत. त्यानंतर ऑक्सिजनबाबत बैठक झाली. मात्र, मोदी फोन उचलत नाहीत असा खोटा आरोप केला जात आहे. हा प्रचार थांबवावा, असं ते म्हणाले.

लोक मंत्र्यांच्या घरात घुसतील

लसीकरणाचा काळाबाजार होत आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर लसी वाया गेल्या आहेत. या लसींची श्वेतपत्रिका काढा, असं माझं जाहीर आव्हान आहे. लोक प्रचंड नाराज आहेत. लसीसाठी वणवण भटकत आहेत. उद्या जर लोक मंत्र्यांच्या, आमदारांच्या घरात घुसले तर नवल वाटायला नको. एवढा लोकांमध्ये संताप आहे, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करत आहात?

हरभजन सिंगने मला फोन करून टेस्टिंग व्हॅन देतो म्हणून सांगितलं. मला जर हरभजन सिंग फोन करत असेल तर मुख्यमंत्र्यांना फोन येत नसतील का? लोक द्यायला तयार आहेत. पण सरकार पुढे यायला तयार नाही. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही काय करत आहात? तुम्ही का लोकांशी बोलत नाहीत, असा सवाल पाटील यांनी केला.

कोविडसाठी एक कोटी द्यायला तयार

नगरसेवक निधीतून दोन ऑक्सिजन प्लांट उभे करणार आहे. अजितदादांनी आमदार निधीतून हे काम करायला घेतलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. मी कोविडसाठी एक कोटी रुपये देण्याचे जाहीर करतो. ऊर्वरीत दोन कोटीही द्यायला तयार आहे, असंही ते म्हणाले. (BJP state president Chandrakant Patil criticizes Dilip Walse Patil)

संबंधित बातम्या:

फडणवीसांनी पोलिसांवर दबाव टाकला, सरकारी कामात हस्तक्षेप; दिलीप वळसे-पाटलांनी दिले कारवाईचे संकेत

Corona Cases and Lockdown News LIVE : वाशिममध्ये दिवसभरात 6 जणांचा मृत्यू 474 नवे रुग्ण

Video | रुग्णवाहिका रस्त्यात फसली, मध्ये रुग्ण अत्यवस्थ; नंतर जे घडलं त्याला पाहून तुम्हीसुद्धा सलाम ठोकाल

(BJP state president Chandrakant Patil criticizes Dilip Walse Patil)

Non Stop LIVE Update
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....