AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, लावलेली नोटीस फाडली, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा खतरनाक कारनामा…

Pune Crime News : पोलिसांना सहकार्य केले नसल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली. मात्र, घरी नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत अत्यंत भयानक प्रकार घडला. खेडकर कुटुंबियांचा आता अजून एक मोठा कारनामा पुढे आल्याचे बघायला मिळतंय.

पोलिसांच्या अंगावर कुत्रे सोडले, लावलेली नोटीस फाडली, वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबाचा खतरनाक कारनामा...
Pooja Khedkar and Manorama Khedkar
| Updated on: Sep 15, 2025 | 4:03 PM
Share

बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरावर पुन्हा एकदा पोलिसांनी नोटीस लावली. पोलिसांना सहकार्य केले नसल्याच्या प्रकरणी पोलिसांनी नोटीस बजावली. मात्र, घरी नोटीस देण्यासाठी गेलेल्या पोलिसांसोबत अत्यंत भयानक प्रकार घडला. हेच नाही तर पोलिसांच्या अंगावर चक्क कुत्रे सोडण्यात आली. नोटीस घेणे तर फार दूरची गोष्टी. पोलिसांनी घरावर लावलेली नोटीसही फाडण्यात आली. यावेळी अधिकाऱ्याच्या अंगावर कुत्रे सोडले. पोलिसांनी घरावर नोटीस लावून सहकार्य केले नाही तर ताब्यात घेण्याची नोटीस दिली आहे.

पुणे शहर पोलिसांनी वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. त्यांच्यावर भा.दं.सं. कलम 221 शासकीय कामात अडथळा आणणे, कलम 238 गुन्ह्याचे पुरावे नष्ट करणे किंवा चुकीची माहिती देऊन आरोपींना कायदेशीर शिक्षेतून वाचवणे आणि कलम 263 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा प्रकार नवी मुंबईतील रोड रेज प्रकरणाशी संबंधित आहे. या प्रकरणात दोन अज्ञात व्यक्तींनी ट्रक ड्रायव्हरच्या मदतनीसाचे अपहरण करून त्याला मनोरमा खेडकर यांच्या घरी आणले होते. तपासादरम्यान नवी मुंबई पोलिसांनी त्या ठिकाणाचा मागोवा घेऊन त्यांच्या घरी पोहोचले. मात्र, पोलिसांचा आरोप आहे की, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांना घरात प्रवेश करण्यास विरोध केला आणि आरोपीला पळून जाण्यास मदत करण्याचा प्रयत्न केला.

पूजा खेडकर हिचे वडील दिलीप खेडकर यांचे नाव चालकाच्या अपहरणाच्या प्रकरणात आले असून पोलीस त्यांना पकडण्यासाठी आले असता त्यांना पळून जाण्यास पूजाच्या आईने मदत केली. पोलिस सध्या पूजा खेडकर हिच्या वडिलांचा शोध घेत आहेत. बडतर्फ प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर मागील काही दिवसांपासून चर्चेत आहेत. फक्त पूजा खेडकर याच नाही तर त्यांचे कुटुंबिय देखील चर्चेत आहे. काही धक्कादायक खुलासे केली जात आहेत. पूजाच्या वडिलांवर गंभीर आरोप असून त्यांचा शोध हा पोलिसांकडून घेतला जातोय.

पूजा खेडकर यांच्या निवासस्थानी पोलीस दाखल झाले. याबद्दल बोलताना नुकताच पीआय भजनाळे यांनी म्हटले की, नवी मुंबईतील पोलिसांना सहकार्य न केल्याबद्दल मनोरमा खेडकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी नवी मुंबई पोलीस कर्मचारी आमच्याकडे आले होते. त्यावेळी मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी अरेरावी केली सरकारी कामात अडथळा आणला आरोपींना पळवून लावले या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या संदर्भातला तपास करण्यासाठी आज आम्ही तपास कार्य सुरू केला आहे. यातील जे आरोपी आहेत त्यांना लवकरच पोलिसांकडून शोधलं जाईल.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.