Pune rain : पुण्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज

हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण, दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र याठिकाणच्या घाट माथ्याच्या परिसरात मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

Pune rain : पुण्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस बरसणार, हवामान विभागाचा अंदाज
खडकवासलातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुण्यातील नदीपात्राची स्थितीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 11:15 AM

पुणे : पुणे आणि परिसरात येत्या दोन दिवसांत आकाश अंशत: ढगाळ राहणार असून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (India Meteorological Department) वर्तविला आहे. मुंबई तसेच राज्यातील इतर ठिकाणीदेखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस खडकवासला धरण (Khadakwasla) साखळीतील चारही धरणे ही शंभर टक्के भरली आहेत. खडकवासला धरणातून आत्तापर्यंत 13.89 टीएमसी इतका पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. वातावरणही अंशत: ढगाळ (Cloudy) राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान, पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. मागच्या वर्षी याच दिवशी या चारही धरणांमध्ये 27.87 टीएमसी इतका पाणीसाठा होता. पावसाचा जोर कमी झाल्याने धरणातून नदी पात्रता करण्यात येणारा विसर्ग कमी करण्यात आला आहे.

मराठवाड्यात पावसाचा अंदाज नाही

हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर कोकण, दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्र याठिकाणच्या घाट माथ्याच्या परिसरात मुसळधार ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात मात्र पावसाचा कोणताही अंदाज वर्तवण्यात आलेला नाही. वातावरणही काही ठिकाणी ढगाळ राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मागील 24 तासांत….

पुण्यात मागील 24 तासांत लवासा येथे 71 मिमी, लोणावळा येथे 48.5, गिरीवन येथे 45.5 मिमी, तर सर्वात कमी पाऊस हा पुरंदर येथे 0.5 मिमी, आंबेगाव येथे 0.5 मिमी, दौंड येथे 0.5 मिमी पडला आहे, असे ट्विट होसाळीकर यांनी केले आहे. मागील आठवड्यात जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणे फुल्ल झाली होती. त्यातून विसर्गही वाढवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

धरणांमधील पाण्याची स्थिती काय?

पावसाचा जोर कमी

खडकवासला धरणातून विसर्ग वाढवल्याने पुण्यातील बाबा भिडे पूल काही काळासाठी बंदही करण्यात आला होता. आता मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झालेला असला तरी घाट माथ्याच्या परिसरात अजूनही अधूनमधून पाऊस पडत असल्याने सध्या खडकवासला धरण साखळीतील चारही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.