आजपासून पुणे व मुंबईत कोरोना लसीकरण बंद? ; जाणून घ्या कारण… 

येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या प्रत्येकाला कोरोना लसीकरणाचा किमान एक डोस द्यावा. याशिवाय, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस वेळेवर द्यावा.

आजपासून पुणे व मुंबईत कोरोना लसीकरण बंद? ; जाणून घ्या कारण... 
covid vaccination
Follow us
| Updated on: Nov 04, 2021 | 5:21 PM

पुणे- शहरात मागील काही महिन्यापासून वेगाने कोरोना लसीकरण मोहिम सुरू आहे. मात्र वेगात सुरू असलेली ही मोहिम आता 4  दिवस बंद राहणार आहे. दिवाळीमुळे 4 ते 7 नोव्हेंबरपर्यंत महापालिका केंद्रांवरील लसीकरण बंद असेल.  लक्ष्मीपूजन , पाडवा, भाऊबीज व रविवारची साप्ताहिक सुट्टी सलग आल्याने, लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र लसीकरणात खंड पडू नये, यासाठी पालिकेच्या लसीकरण केंद्रावर उद्या दुपारपर्यंत कोविशिल्ड व कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध असतील. नागरिकांची गैरेसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.

इतक्या लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण आतापर्यंत शहरात तब्बल 51 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. 2 नोव्हेंबरपर्यंत 51 लाख 16 हजार 124 जणांना लस देण्यात आली आहे. यामध्ये 32 लाख 3 हजार 402 जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 19 लाख 12 हजार 772 जणांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले आहेत. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून लसीकरणाचा वेग वाढला असून प्रत्यक्ष केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे.

मुंबईतही लसीकरण बंद याबरोबरच मुंबईतही राज्य सरकार आणि BMC संचालित कोरोना लसीकरण केंद्रावरील लसीकरण मोहिम चार दिवस बंद राहणार आहेत. सोमवारपासून ही लसीकरण केंद्रे पुन्हा सुरू होणार आहेत. महापालिकेने (BMC) ही माहिती दिली आहे.  मुंबईत कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवण्यावर BMC ला यश मिळत आहे. मुंबईत कोरोना संसर्गाच्या प्रमाणात लक्षणीय घट झालीआहे. आठवड्यात तो 0.04 टक्क्यांवर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी हा दर ०.०६ टक्के होता. मुंबईतील कोरोना संसर्गाच्या दुप्पट होण्याचा कालावधीही 1 हजार 596 वर पोहोचला आहे. तसेच, आता शहरातील झोपड्या आणि चाळींमध्ये कोणतेही कंटेन्मेंट झोन राहिलेले नाहीत.

30 नोव्हेंबरपर्यंत 100 टक्के लसीकरणाचे लक्ष येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात 100 टक्के लसीकरण पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. लसीकरणासाठी पात्र असलेल्या प्रत्येकाला कोरोना लसीकरणाचा किमान एक डोस द्यावा. याशिवाय, ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस वेळेवर द्यावा. दुर्गम भागात मोबाईल युनिटमधून घरोघरी जाऊन लस देण्यात यावी असेही सांगण्यात आले आहे.

इतर बातम्या :

पुणे: दिवाळीच्या मुहूर्तावर सोने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; सोन्याचे दर 47 हजारांच्या पार

पुण्यात सराईत वाहनचोर अटकेत, 51 दुचाकींसह 36 लाखांचा मुद्देमाल जप्त

बनावट प्रमाणपत्रे दावून वानखेडेंनी नोकरी बळकावली, भीम आर्मीची जात पडताळणी समितीकडे तक्रार

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.