Corona Vaccine : पुणेकरांना मोठा दिलासा, 2 दिवसांत कोरोना लसीचे पावणे चार लाख डोस मिळणार

पुण्यासाठी केंद्र सरकारकडून आज रात्री 2 लाख 48 हजार लसीचे डोस येणार आहेत. तर 1 लाख 25 हजार डोस शनिवारी उपलब्ध होणार आहेत.

Corona Vaccine : पुणेकरांना मोठा दिलासा, 2 दिवसांत कोरोना लसीचे पावणे चार लाख डोस मिळणार
कोरोना लस प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Apr 09, 2021 | 6:41 PM

पुणे : राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. दिवसेंदिवेस रुग्णसंख्या झपाट्याने वाढतेय. पुण्यातील कोरोनाची स्थितीही चिंताजनक बनत चाललीय. अशावेळी राज्यात कोरोना लसीचा मोठा तुटवडा भासतोय. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोध पक्ष असलेल्या भाजप नेत्यांमध्ये जोरदार राजकारण रंगलंय. पुण्यातही अनेक लसीकरण केंद्रांवर लसीचा साठा संपल्यामुळे लस टोचण्यासाठी आलेल्या नागरिकांना माघारी परतावं लागलं. मात्र, केंद्र सरकारने पुणेकरांना मोठा दिलासा दिलाय. (Pune will get 3 lakh 73 thousand corona vaccine dose in two days)

पुण्यासाठी केंद्र सरकारकडून आज  2 लाख 48 हजार लसीचे डोस मिळाले आहेत. तर 1 लाख 25 हजार डोस शनिवारी उपलब्ध होणार आहेत. म्हणजे दोन दिवसांत पुण्यासाठी जवळपास पावणे चार लाख लसीचे डोस मिळणार आहेत. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान राज्याला डावलून केंद्र सरकारने थेट पुण्याला लसीचे डोस दिल्याची चर्चा आता सुरु झालीय.

पुण्यातील कोरोनाची स्थिती बिकट

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा कोलमडण्याच्या मार्गावर आहे. या संकटात आता आणखीनच भर पडली आहे. कारण, सामान्य लोकांना कोरोना उपचार घ्यायचे झाल्यास आशेचे केंद्र असलेले जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. अवघ्या 12 दिवसांमध्ये हे सेंटर भरले आहे. सध्याच्या घडीला या कोव्हिड सेंटरमध्ये 600 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. गेल्यावर्षी कोरोनाची साथ शिगेला असतानाही या कोव्हिड सेंटरमध्ये 300 ते 400 रुग्ण होते. मात्र, आता हे कोव्हिड सेंटरही पूर्णपणे भरले आहे. त्यामुळे आता कोरोना रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास रुग्णांवर उपचार कसे करायचे, हा प्रश्न आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

पुणेकरांनो सावध राहा; एकही व्हेंटिलेटर बेड उरला नाही

पुण्यात सध्याच्या घडीला रुग्णाला व्हेंटिलेटवर ठेवायचे झाल्यास एकही बेड शिल्लक नाही. तर कोरोनाच्या उपचारात महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या ऑक्सिजन बेडसची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. सध्याच्या घडीला संपूर्ण पुणे जिल्ह्यात केवळ 376 ऑक्सिजन बेडस उरले आहेत. व्हेंटिलेटर्स बेडससाठी रुग्ण अक्षरश: वेटिंग लिस्टमध्ये आहेत. एखादा बेड खाली झालाच तर तात्काळ तो भरला जातो. राज्याच्या इतर भागातूनही पुण्यात मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत आहेत. त्यामुळे आता कोरोनाचा प्रकोप असाच वाढत राहिल्यास काय करायचे, असा प्रश्न प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेला पडला आहे.

विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

पुण्यात आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. सोमवारी सकाळी 7 वाजेपर्यंत हा कडक लॉकडाऊन असेल. या काळात फक्त दूध आणि मेडिकल सुविधा सुरु असतील. वैद्यकीय आणि अतितातडीच्या कारणासाठीच नागरिकांना बाहेर पडता येणार आहे. घराबाहेर पडलेल्या लोकांची पोलिसांकडून खातरजमा केली जाईल, अशी माहिती पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलीय.

संबंधित बातम्या :

Pune Coronavirus: दुकाने उघडलीत तर कारवाई होणार; आयुक्तांचा व्यापाऱ्यांना इशारा

पुण्यात कोरोनाचा कहर, रुग्णांसाठी बेड, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन आणि लसीची आकडेवारी काय? वाचा आयुक्तांची माहिती

Pune will get 3 lakh 73 thousand corona vaccine dose in two days

Non Stop LIVE Update
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.