AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona | कोरोनाचा नवीन विषाणू वाढतोय ; भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का? काय म्हणाले डॉ. अविनाश भोंडवे

या विषाणुचा धोका या टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. याबरोबच शहरातील रुग्णालयातील सुविधा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे.

Corona | कोरोनाचा नवीन विषाणू वाढतोय ; भारतात कोरोनाची चौथी लाट येणार का? काय म्हणाले डॉ. अविनाश भोंडवे
कोरोनाची चौथी लाट येईल का
| Edited By: | Updated on: Mar 19, 2022 | 1:05 PM
Share

पुणे – आता कुठे कोरोनाची तिसरी लाट ( third wave of corona)पूर्णपणे ओसरली आहे. जनजीवन पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाच्या नवीन विषाणूंचा धोका निर्माण झाला आहे. चीन आणि इतर युरोपीय देशातील वाढती रुग्णसंख्या पाहता चौथी लाट येण्याचा शक्यता व्यक्त केली जात आहे. जगामधील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या आठ टक्क्यांनी वाढली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे चीन या हाँगकाँग , दक्षिण कोरिया या देशांमध्ये ही रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्या वाढली आहे. युरोपीय देशांमध्ये जर्मनी जपान येथेही कोरोना रुग्ण वाढत आहेत. या सगळ्यामुळे कोरोनाची चौथी लाट (fourth wave of the corona)येईल का अशी भीती निर्माण झाली आहे. कोरोनाचा हा ओमायक्रोन बी 2 (Omycron B2) हा जो विषाणू सगळीकडं पसरत आहे. या व्हेरियंटची लाट नुकतीच आपल्या देशात येऊन गेली असल्याची माहिती आय एम ए चे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे यांनी दिली आहे.

या वयोगटातील लोकांना धोका

भारत व महाराष्ट्रात साधारण नोव्हेंबर 2021 फेब्रुवारी 2022पर्यत आधी ओमायक्रोन बी ए 1 व बी ए 2  या ओमायक्रॉनच्या सब व्हेरियंटचे रुग्ण सगळीकडं आढळत होते. या रुग्णांना फारशी बाधा होत नाही बी 2 हा बी1  सारखाच विषाणू आहे, हा विषाणू फार वेगाने पसरतो.मात्र यामुळे रुग्णालयात भरती व्हावे लागत नाही, असेही ते म्हणाले आहेत. साधारण 70  च्या पुढच्या वयोगटातील लोकांना याचा धोका संभवतो. त्यातही ज्या लोकांचे लसीकरण झाले नाही. त्यांना याची लागण होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे या विषाणुचा धोका या टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेतली पाहिजे. यासाठी लसीकरणाचा वेग वाढवायला हवा. याबरोबच शहरातील रुग्णालयातील सुविधा सज्ज ठेवणे आवश्यक आहे. याबरोबरच कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. लसीकरण वेगाने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

जरी कोरोनाचा नवीन विषाणू आला तरी तो फारसा वेगाने पसरणारा नाही. अशी शक्यता आहेत . मात्र हा विषाणू पसरू नये यासाठीची काळजी आपण घ्यायलाच हवी असे मत डॉ अविनाश भोंडवे यांनी व्यक्त केले आहे.

औरंगजेबाच्या कबरीपुढे झुकणारे Abdul Sattar चालतात, मग MIM का नकोय? खासदार जलील यांचा राऊतांना सवाल Aurangabad | नाराज आमदारांना भाजपची खुली Offer, औरंगाबादेत Dr. Bhagwat Karad यांचं वक्तव्य!

Raosaheb Danve फक्त स्वप्न पाहतात, मनोरंजनाच्या गप्पा मारतात; खडसेंचा चिमटा!

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...