AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदीचे आदेश, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर निर्णय

संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदीचे आदेश, आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर निर्णय
DNYANESHWAR MAHARAJ SANT TUKARAM
| Edited By: | Updated on: Jul 17, 2021 | 11:35 PM
Share

पुणे : संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पादुका पंढरपूर येथे घेऊन जाण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या कार्यक्रमादरम्यान गर्दी होऊ नये तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. (Curfew has been imposed in Pimpri Chinchwad Dehu Road Nigdi Pimpri Bhosari Alandi Police on occasion of Ashadhi Ekadashi)

अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी नियमांतून वगळले

लागू करण्यात आलेल्या आदेशानुसार देहूरोड, निगडी, पिंपरी, भोसरी, आळंदी व दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मार्गावर तसेच देहू, आळंदी मंदिर व आजूबाजूच्या परिसरात 19 जुलै या दिवशी पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास बंदी असेल. अत्यावश्यक सेवेतील वाहने, डॉक्टर, वैद्यकीय सेवेतील कर्मचारी, रुग्णवाहिका या सेवांना जमावबंदीमधून वगळण्यात आले आहे. दसेच देहूगाव, आळंदीमधील स्थानिक नागरिकांजवळ ओळखपत्र असेल तरच प्रवेश मिळणार आहे.

महापुजेचा मान विणेकरी केशव कोलते आणि इंदुबाई कोलते यांना

दरम्यान, आषाढी वारीच्या महापुजेसाठी वारकऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या समवेत श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची आषाढी एकादशीची महापूजा करण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते (वय 71) आणि इंदुबाई केशव कोलते (वय 60) या दांपत्याला मिळाला आहे. गेल्या 20 वर्षापासून ते श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विणेकरी म्हणून सेवा बजावत आहेत. हे दांपत्य वर्धा जिल्ह्यातील आहे आज मंदिरातील सहा विणेकऱ्यांमधून चिट्टी टाकून मानाचा वारकरी निवडण्यात आला. कोरोना संसर्गामुळं वारी पांरपारिक पद्धतीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं होण्याऐवजी नियमांसह होत असल्यानं मानाचा वारकरी निवडण्याची परंपरा बदलण्यात आली आहे.

आषाढी यात्रेच्या सोहळ्यासाठी वाखरी पालखी तळाची तयारी पूर्ण

20 जुलैला होणाऱ्या आषाढी एकादशीसाठी राज्यभरातून दहा संतांच्या मानाच्या पालख्या या सर्वप्रथम वाखरी येथील पालखीतळावर येणार आहेत. या ठिकाणी दहा पालख्यांना थांबण्यासाठी दहा मंडपाचे काम सुरू आहे. प्रत्येक पालखीतील चाळीस वारकऱ्यांना थांबण्याची आणि भोजनाची सोय श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून येथे केली जाणार आहे. तसेच बॅरिकेटींग, स्वच्छता, विद्युतव्यवस्था, स्वछतागृहे, आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय व्यवस्था, वॉटरप्रुफ मंडप आदी व्यवस्था पूर्ण करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यानी दिली आहे.

इतर बातम्या :

‘सहकार खातं दबावासाठी असेल तर हा महाराष्ट्र, इथं दबाव टाकून सत्ताबदल होत नाही’, पवार-मोदी भेटीनंतर संजय राऊतांचा भाजपला इशारा

आषाढी वारीसाठी कडक निर्बंध, मग मंत्र्यांसाठी नियम नाहीत ?, जयंत पाटलांच्या बैठकीत कोरोना नियमांची ऐशीतैशी

पिंपरी-चिंचवडमधील सर्व शाळा 31 जुलैपर्यंत बंद राहणार, महापालिका आयुक्तांचे आदेश

(Curfew has been imposed in Pimpri Chinchwad Dehu Road Nigdi Pimpri Bhosari Alandi Police on occasion of Ashadhi Ekadashi)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.