AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Flight | पायलट आला नाही, पुणे शहराकडे येणारे विमान सलग दुसऱ्या दिवशी खोळंबले

Pune Air India Flight | पुणे शहराकडे येणाऱ्या विमानाच्या उड्डानाची सर्व तयारी झाली होती. प्रवाशीही बसले होते. परंतु विमानाचे उड्डान होत नव्हते. पायलट आला नाही म्हणून विमान उड्डानास झाले नाही. ही घटना सलग दोन दिवस घडली.

Pune Flight | पायलट आला नाही, पुणे शहराकडे येणारे विमान सलग दुसऱ्या दिवशी खोळंबले
| Updated on: Sep 28, 2023 | 3:40 PM
Share

पुणे | 28 सप्टेंबर 2023 : पुणे शहराकडे येणारे विमान दिल्ली विमानतळावर रन वेवर तयार झाले होते. प्रवाशी विमानात जाऊन बसले होते. त्यात लहान मुले आणि वृद्धही होते. परंतु विमान काही टेकऑफ घेत नव्हते. बराच वेळ ताटकळत बसल्यावर प्रवाशांमध्ये कुजबुज सुरु झाली. यावेळी विचारणा सुरु झाली. परंतु उत्तर मिळत नव्हते. यामुळे लोकांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यावेळी कंपनीच्या कर्मचार्‍यांनी विलंबाचे कारण सांगितले. ऑपरेशनलमधील समस्येमुळे विमान टेकऑफ घेत नसल्याचे सांगितले.

काय झाला होता प्रकार

एअर इंडियाचे विमान 26 सप्टेंबर रोजी दिल्लीवरुन पुणे शहराकडे येणार होते. विमान क्रमांक AI853 धावपट्टीवर तयार होते. प्रवाशाही विमानात बसले होते. विमान कंपनी पायलटची वाट पाहत होती. तब्बल चार तास विमान उभे होते. या फ्लाइटमध्ये 100 हून अधिक प्रवासी होते. त्यांना हे विमान का थांबले आहे? याची काहीच माहिती मिळत नव्हती.

का आला नाही पायलट

आपली कामाची वेळ संपल्यामुळे पायलट विमानातून निघून गेल्याची माहिती सूत्रांनी दिले. 26 सप्टेंबर रोजी विमानाचा दुसरा पायलट रात्री 10.30 वाजता आला. त्यानंतर 11:15 वाजता विमानाने पुणे शहराकडे उड्डन घेतले. विमानास विलंब होत असताना अनेकांनी व्हॉट्सॲपद्वारे विमान कंपनीशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता. यापूर्वी 25 सप्टेंबर दिल्ली-पुणे विमान उशिराने निघाले. सलग दुसऱ्या दिवशी उशीर झाला. 25 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7.10 वाजता निघणारे विमान रात्री 9 वाजता दिल्लीहून निघाले होते. त्यानंतर ते पुणे शहरात रात्री 11 वाजता आले.

काय म्हणतात विमानातील प्रवाशी

विमानास उशीर होत असल्यामुळे प्रवाशांमध्ये कुजबुज सुरु होती. यासंदर्भातील आपले अनुभव काही प्रवाशांनी सोशल मीडियावर टाकले आहे. एक्सवर लिहिताना एका युजरने म्हटले की, आमच्या विमानाचे अपहरण झाल्यासारखे आम्हाला वाटत होते. श्वास कोंडून ठेवणारे ते वातावरण होते. यापूर्वी पायलट न आल्यामुळे 5 जुलै रोजी दिल्लीवरुन कोलकात्याला जाणारे इंडिगोचे विमान एक तास उशिराने उड्डाण केले होते.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.