AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona alert | वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; रुग्णालयात १५ हजार बेड सुज्ज

कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात जवळपास 38 ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभारण्यात आले आहेत. यातून रोज 11 हजार 89 लीटर पर मिनिट ऑक्सिजनची निर्मित केला जात आहे. जवळपास 3 हजार रुग्णांना 4 लीटर पर मिनिट दराने या ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो.

Corona alert | वाढत्या कोरोना रुग्णसंख्येला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज; रुग्णालयात १५ हजार बेड सुज्ज
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 12:25 PM
Share

पुणे – ओमिक्रॉन व कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनामुळे पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झाली आहे. कुठल्याही परिस्थीतीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाला आहे. शहरातील रुग्णालयात 15 हजार 575 ऑक्सिजन खाटा, 3 हजार337  अतिदक्षता विभागातील खाटा तर 1 हजार 825  व्हेटीलेटर सज्ज ठेवण्यात आले आहे.

दुप्पटीने वाढतीय संख्या

गेल्या दोन आठवड्यापासून रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुरुवारी पुणे शहरात 298, पिंपरी चिंचवडमध्ये 80, नगर पालिका क्षेत्रात 10, कॅन्टोन्टमेंट परिसरात 20 तर ग्रामीण भागात 69असे एकुण जिल्ह्यात 477  रुग्ण आढळले. जिल्ह्यात एकुण 2 हजार 556 सक्रीय कोरोना बाधित रुग्ण आहेत. ही संख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन पुन्हा धास्तावले असून खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर 15 हजार 575 ऑक्सिजन खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. त्याच बरोबर 3 हजार 337 अतिदक्षता विभागातील खाटा तर 1 हजार 825 व्हेंटिलेटर सज्ज ठेवण्यात आले आहेत.

ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट कोरोनाच्या रुग्णसंख्येमुळे ऑक्सीजनचा पुरवठा कमी पडू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. सद्यस्थितीला जिल्ह्यात जवळपास 38 ऑक्सिजन निर्मितीचे प्लँट उभारण्यात आले आहेत. यातून रोज 11 हजार 89 लीटर पर मिनिट ऑक्सिजनची निर्मित केला जात आहे. जवळपास ३ हजार रुग्णांना 4 लीटर पर मिनिट दराने या ऑक्सिजनचा पुरवठा केला जाऊ शकतो. या सोबतच 464. 7  मेट्रीक टन लिक्विड स्वरूपात ऑक्सीजन साठा करण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत360  मॅट्रीकटन ऑक्सिजनची मागणी होती. सध्याच्या घडीला दोन दिवस अतिरिक्त पुरवठा करता येईल येवढा साठा पुणे जिल्ह्यात उपलब्ध आहे.

महाविद्यालय पुन्हा ऑनलाईन? ओमिक्रॉन व कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालये पुन्हा सुरु करायचे का? याबाबत चर्चा सुरु आहे. उच्च शिक्षणविभाग पुन्हा महाविद्यालये ऑनलाईन सुरु करण्याच्या विचाराधीन आहे. याबाबत येत्या २ जानेवारीला निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. याबाबत राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरुची बैठक पार पाडली आहे.

जीएसटी परिषदेच्या 46 व्या बैठकीला सुरुवात, अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची उपस्थिती; महत्त्वपूर्ण विषयांवर निर्णयाची शक्यता

रेती तस्करी थांबवताना महिला सिंघम वनरक्षकावर जीवघेणा हल्ला, ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न

Liger First Glimpse : लोकल स्ट्रीट ते बॉक्सिंग रिंग, दमदार अ‍ॅक्शनसह विजय देवरकोंडा प्रेक्षकांच्या भेटीला!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.