महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब कसबे, ऊर्जामंत्री राऊतांकडून अभिनंदन

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व परिवर्तनवादी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड झाली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी पुन्हा रावसाहेब कसबे, ऊर्जामंत्री राऊतांकडून अभिनंदन
Dr. Raosaheb Kasbe

मुंबई : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक व परिवर्तनवादी विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांची फेरनिवड झाल्याबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. समतेच्या चळवळीचे खंदे पाठीराखे, राज्यघटनेचे अभ्यासक व लोकशाही मूल्य जपणारे कसबे यांची फेरनिवड मसापला देशपातळीवर घेऊन जाईल, असे मत डॉ. राऊत यांनी व्यक्त केले. (Dr. Raosaheb Kasbe re-elected as president of Maharashtra Sahitya Parishad, Nitin Raut Congratulates)

गेल्या कित्येक वर्षांपासून डॉ. कसबे हे दलित व परिवर्तनवादी चळवळीचे खंदे समर्थक राहिले असून आपल्या वैचारिक लिखाणाने त्यांनी मराठी साहित्य विश्वाला व संस्कृतीला समृध्द केले आहे.

मराठी साहित्याच्या सेवेत केवळ महाराष्ट्र व देशपातळीवरच नव्हे तर, जगभर विखुरलेल्या विविध संस्थांमध्ये पुण्याच्या ‘मसाप’चे स्थान गौरवाचे आहे. कसबे यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने मसाप साहित्य रसिकांना एका नव्या पातळीवर घेऊन जाईल, असा आशावाद डॉ राऊत यांनी व्यक्त केला आहे.

इतर बातम्या

जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरलं, भरती नसताना मिठी नदीला पूर आला, मुंबई धोक्याच्या उंबरठ्यावर?; शेलारांची भीती

ठाणे पालिकेचे विरोधी पक्षनेते अ‍ॅक्शन मोडवर, कंबरभर पाण्यातून वाट कढत तोडली संरक्षक भिंत; पूरस्थिती टळली

फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रात पेगासस कांड घडले का याची चौकशी करा; सचिन सावंत यांची मागणी

(Dr. Raosaheb Kasbe re-elected as president of Maharashtra Sahitya Parishad, Nitin Raut Congratulates)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI