AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : थकबाकीमुळे पुण्यातल्या कोयाजी रोडवरच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित, ऐन पावसाळ्यात वाहनधारकांची गैरसोय

महाराष्ट्र राज्य वीज वितरण लिमिटेड कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करून कोयाजी रोड, कॅम्प परिसरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. एकतर पावसाचे दिवस असून त्यात वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रीच्या वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

Pune : थकबाकीमुळे पुण्यातल्या कोयाजी रोडवरच्या पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित, ऐन पावसाळ्यात वाहनधारकांची गैरसोय
कोयाजी रोडवरील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडितImage Credit source: Times
| Updated on: Aug 11, 2022 | 12:26 PM
Share

पुणे : महाराष्ट्र राज्य वीज वितरण लिमिटेड (MSEDCL)ने कॅम्पमधील कोयाजी रोडवरील 300 मीटर पट्ट्यातील पथदिव्यांचा वीजपुरवठा आता महिनाभरासाठी बंद केला आहे. रोखीने अडचणीत असलेल्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाकडे (Pune Cantonment Board) 6 लाखांहून अधिक थकबाकी आहे. या कारवाईमुळे मराठा वॉर मोमोरियल ते छावणी (Camp) पोलीस स्टेशन पर्यंतचा रस्ता अंधारात गेला आहे. तर गैरसोय होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाने लोकांच्या सुरक्षेला महत्त्व द्यायला हवे होते. कॅन्टोन्मेंट आणि पुणे महानगरपालिका (पीएमसी) हद्दीत राहणारे बरेच लोक या रस्त्याचा वापर करतात, असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. लष्करी अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि संरक्षण क्षेत्रातील नागरिकांनीही कोयाजी रोड परिसर अंधारात गेल्याबाबत नाराजीचा सूर काढला असून तक्रारीदेखील केल्या आहेत.

‘…मात्र त्यांनी नकार दिला’

पीसीबीच्या एका वरिष्ठ अभियांत्रिकी विभाग अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की MSEDCLने शिवाजी मार्केटला पुरवल्या जाणाऱ्या विजेवर व्यावसायिक दर लागू केले आणि त्या बिलात कोयाजी रोड स्ट्रीट लाइटची देयके विलीन केली. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सीईओ सुब्रत पाल म्हणाले, आम्ही महावितरणच्या उच्च अधिकाऱ्यांकडे बिलाचा मुद्दा पुन्हा मांडू. महावितरणच्या जेजे गार्डन विभागाच्या प्रभारी सहायक अभियंता वर्षा स्वामी म्हणाल्या, की आम्ही थकबाकी भरण्यात अयशस्वी झाल्यामुळे बिले इतर कनेक्शनमध्ये विलीन करू शकतो. आम्ही हप्तेही मागितले, पण त्यांनी नकार दिला.

नागरिकांची गैरसोय

महाराष्ट्र राज्य वीज वितरण लिमिटेड कंपनीने थकबाकीचे कारण पुढे करून कोयाजी रोड, कॅम्प परिसरातील पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे या परिसरातीलच नव्हे तर या रस्त्याचा वापर करणाऱ्या पुणे परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांची मोठी गैरसोय होत आहे. एकतर पावसाचे दिवस असून त्यात वीजपुरवठा खंडित केल्याने रात्रीच्या वेळी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. छोटे मोठे अपघात वाढण्याची शक्यता आहे. शिवाय रस्त्यावर खड्डे असतील तर त्यात आणखी गैरसोय… त्यामुळे यावर लवकरात लवकर मार्ग काढावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.