फ्रॅक्चर खांद्याने उडवलं डॅमेज प्लेन, पाकिस्तानच्या तुरुंगातून पळाले, कोण होते डीके पारुळकर? पुण्यात घेतला अखेरचा श्वास
इंडिया एअर फोर्सच्या वीराची ही कहाणी खरच प्रेरणादेणारी आहे. त्यांच्या शौर्याला सलाम. डी.के.पारुळकर यांचे सुपूत्र आदित्य पारुळकर यांनी माहिती देताना सांगितलं की, माझ्या वडिलांच सोमवारी सकाळी पुणे येथील निवासस्थानी निधन झालं.

इंडियन एअरफोर्सचे ग्रुप कॅप्टन डी. के. पारुळकर (सेवानिवृत्त) यांचं निधन झालं आहे. त्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात असामान्य साहस आणि दृढ संकल्प काय असतो? ते दाखवून दिलेलं. त्यांनी पाकिस्तानच्या कैदेतून पळण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली. त्यांचं योगदान भारतीय सैन्य इतिहासात एक प्रेरणादायी अध्याय म्हणून लक्षात ठेवला जाईल. एका वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार महाराष्ट्रात पुण्याजवळ त्यांचं निधन झालं. IAF ने एक्सवर पोस्ट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या साहसाच, शौर्यच कौतुक केलं आहे.
डी.के.पारुळकर यांचे सुपूत्र आदित्य पारुळकर यांनी माहिती देताना सांगितलं की, माझ्या वडिलांच सोमवारी सकाळी पुणे येथील निवासस्थानी वयाच्या 82 व्या वर्षी हार्ट अटॅकने निधन झालं. पारुळकर यांच्या पश्चात पत्नी अणि दोन मुलं असा परिवार आहे. त्यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येतील.
त्या स्थितीतही साहस, संयम सोडला नाही
मार्च 1963 साली एअर फोर्समध्ये कमीशन प्राप्त केल्यानंतर पारुळकर यांनी आपल्या करिअरमध्ये एअरफोर्स प्रबोधिनीत फ्लाइंग इंस्ट्रक्टरसह अनेक महत्त्वाच्या पदांवर सेवा दिली. 1965 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांचं विमान शत्रुच्या गोळीबाराच्या रेंजमध्ये आलेलं. त्यांच्या खांद्याला दुखापत झालेली. त्या स्थितीतही त्यांनी साहस, संयम सोडला नाही. त्यांच्या सीनिअरने त्यांना विमानातून बाहेर पडण्याचा सल्ला दिला. पण त्या अवस्थेतही त्यांनी डॅमेज प्लेन बेसपर्यंत सुरक्षित आणलं. या शौर्यासाठी त्यांना एअर फोर्स पदकाने सन्मानित करण्यात आलं.
पाकिस्तानच्या कैदेतून कसे पळाले?
1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान विंग कमांडर पारुळकर यांना पाकिस्तान रावळपिंडी येथील युद्धकैद्यांच्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आलेलं. तिथे त्यांना इंडियन एअरफोर्सचे आणखी दोन सहकारी भेटले. त्यांची नावं होती, एम.एस. गरेवाल आणि हरीश सिंहजी. पाकिस्तानच्या युद्धबंदी शिबिरातून बाहेर पडणं कठीण होतं. पण या शूरवीरांनी खणून भुयारी मार्ग बनवला. गार्डपासून लपवून त्यांनी हा मार्ग बनवला. त्यानंतर 13 ऑगस्ट 1972 रोजी ग्रुप कॅप्टन रहे डीके पारुळकर, मलविंदर सिंह गरेवाल आणि हरीश सिंह तिथून पळण्यात यशस्वी ठरले. डीके पारुळकर यांनी या प्लानच नेतृत्व केलं. त्यांना विशिष्ट सेना पदक सुद्धा मिळालं.
