मौज-मजेसाठी वाहनचोराने थोडी थोडकी नव्हे चोरली ‘इतकी’ वाहने

आरोपी संतोष शिवराम घारे हा वयाच्या 17 वर्षापासून वाहनचोरी करत आहे. चोरी केवळ ऐषोरामासाठी चोरी करत असल्याची धक्कदायक माहिती पोलीस तपासाच्या दरम्यान पुढे आहेत. त्याच्यावर आतापर्यंत200 गुन्हे दाखल आहेत.

मौज-मजेसाठी वाहनचोराने थोडी थोडकी नव्हे चोरली 'इतकी' वाहने
crime
Follow us
| Updated on: Nov 07, 2021 | 12:17 PM

पिंपरी – पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात वाहनचोरीच्या घटना सातत्याने घडत असतात. अश्यातच एक दोन नव्हे तर तब्बल 51 वाहनांच्या चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी- चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकाने अटक केली आहे. टाका केलेलया आरोपीकडून एकूण 36 लाख किंमतीच्या 51 दुचाकी जपत केल्या आहेत. शंकर भिमराव जगले (वय 20रा. हारगुडे वस्ती, चिखली), संतोष शिवराम घारे (वय 39, रा. ओझर्डे, ता. मावळ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

यामधील आरोपी संतोष शिवराम घारे हा वयाच्या 17 वर्षापासून वाहनचोरी करत आहे. चोरी केवळ ऐषोरामा करण्यासाठी चोरी करत असल्याची धक्कदायक माहिती पोलीस तपासाच्या दरम्यान पुढे आहेत. त्याच्यावर आतापर्यंत 200 गुन्हे दाखल आहेत. आरोपीवर पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड, नगर, नाशिक येथून वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. शंकर जगले हा घरफोडीच्या गुन्ह्यात फरार होता. त्याच्यावर वाहनचोरी, मोबाईल चोरी, घरफोडी, दरोड्याचा प्रयत्न असे सात गुन्हे दाखल आहेत. अशी माहिती दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहायक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर कैलासे, फौजदार मंगेश भांगे यांच्या पथकाने केली.

पोलिसांनी असा घेतला शोध तळेगाव – दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन चोरीचे सर्वाधिक गुन्हे घडल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. यावरूनच फौजदार मंगेश भांगे यांनी सुमारे 450 हून अधिक सीसीटीव्ही तपासून वाहन चोरांचा शोध घेतला. त्यातून या आरोपींची माहिती मिळाली. त्यातील दोनजण पवना हॉस्पिटल या ठिकाणी येत असून ते या भागातील नसल्याची माहिती भांगे यांना मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना पाहताच आरोपीं दुचाकीवरुन पळून गेले. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन उर्से गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता दुचाकी चोरीची कबुली दिली. आरोपी अट्टल गुन्हेगार असल्याने त्यांची वेळेवेळी पोलीस कोठडी घेऊन सखोल चौकशी केली. त्यावेळी त्यांनी चोरलेल्या दुचाकीबाबत माहिती दिली.

हे ही वाचा:

पक्ष वेगळे भावना सारखी, सुप्रिया सुळे आणि हर्षवर्धन पाटलांच्या मुलाची अपघातग्रस्तांना एकत्र मदत

राज्यातील गंभीर समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठी समीर वानखेडेंवर टीका, चंद्रकांत पाटलांचा आरोप

अग्नीशामक दलाच्या जवानांसोबत रुपाली चाकणकरांनी साजरी केली ‘भाऊबीज’

Non Stop LIVE Update
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.