AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यातील गंभीर समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठी समीर वानखेडेंवर टीका, चंद्रकांत पाटलांचा आरोप

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, एसटी कामगारांच्या गंभीर समस्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून दररोज समीर वानखेडे यांना टार्गेट करण्यात येत आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले.

राज्यातील गंभीर समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष होण्यासाठी समीर वानखेडेंवर टीका, चंद्रकांत पाटलांचा आरोप
चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप
| Edited By: | Updated on: Nov 06, 2021 | 7:35 PM
Share

पुणे : राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाही, एसटी कामगारांच्या गंभीर समस्या, महिलांवरील वाढते अत्याचार अशा समस्यांकडे जनतेचे दुर्लक्ष व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून दररोज समीर वानखेडे यांना टार्गेट करण्यात येत आहे, असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना केले. (Chandrakant Patil criticizes Thackeray government over Sameer Wankhede case)

एखाद्या अधिकाऱ्याची आई, पत्नी किंवा वडील यांच्यावर सतत टीका करणे समजण्या पलिकडचे आहे. आपली सर्व संबंधितांना विनंती आहे की, हा प्रकार थांबवा आणि तपासी यंत्रणांना त्यांचे काम करू द्या, असे आवाहन त्यांनी केले. गुन्ह्यात तपास करणाऱ्या अधिकाऱ्याला धारेवर धरले की मूळ अंमली पदार्थांचा आणि गुन्ह्यावरील कारवाईचा विषय बाजूला राहतो, असे ते म्हणाले.

‘..म्हणून मलिकांनी वानखेडेंना धारेवर धरले’

नवाब मलिक हे राज्याचे मंत्री आहेत व त्यांना अधिकार आहेत. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात काही असेल तर चौकशी करून शिक्षा करा. पण एखाद्या अधिकाऱ्याला सतत इतके धारेवर धरावे का, असा सवाल पाटील यांनी केला. ते म्हणाले की, केवळ नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली म्हणून वानखेडे यांना धारेवर धरले, असे प्रकरण दिसत नाही. याचे धागेदोरे अनेक वर्षापूर्वीचे असावेत आणि जुने हिशेब चुकते करणे चालू असावे, असा अंदाज आहे.

नगरच्या घटनेविषयी शोक

नगर येथे रुग्णालयाला आग लागून रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटनेबद्दल मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी तीव्र शोक व्यक्त केला. या दुर्घटनेतील जखमींना व मृतांच्या कुटुंबियांना तातडीने मदत करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

पोटनिवडणुकीतील पराभवामुळे दरवाढ कमी केल्याचा दावा खोटा

राज्यासह देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानेच पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यात आले आहेत, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. आघाडीच्या नेत्यांचा हा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी फेटाळून लावला आहे. विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाची पिछेहाट झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या दरात केंद्राने सवलत दिल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. देशात नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाच्या जागा 6वरून वाढून 7 झाल्या. याखेरीज भाजपाच्या मित्रपक्षांचे उमेदवार निवडून आले. दुसरीकडे या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या आमदारांची संख्या 10वरून 8 झाली. तरीही भाजपाची पिछेहाट झाल्याचा दावा करणाऱ्यांनी वस्तुस्थिती समजून घ्यावी, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

इतर बातम्या :

Ahemadnagar Hospital Fire : मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखाची मदत, आरोग्यमंत्र्यांची घोषणा; जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशी होणार

Special Report : राज्यात रुग्णालयांमधील दुर्घटनांचे सत्र सुरुच! कधी वायुगळती तर कधी आग, रुग्णांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?

Chandrakant Patil criticizes Thackeray government over Sameer Wankhede case

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.