‘..नाहीतर तुझा कार्यक्रम करेन’, व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल अडचणीत

सोशल मीडियावरुन टीका करणाऱ्या एका तरुणाला 'तुझा कार्यक्रम करेन' अशी धमकी दिल्याचा आरोप योगेश बहल यांच्यावर करण्यात आला आहे.

'..नाहीतर तुझा कार्यक्रम करेन', व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर योगेश बहल अडचणीत
Follow us
| Updated on: Mar 04, 2021 | 9:30 PM

पिंपरी-चिंचवड : एका व्हायरल होत असलेल्या ऑडिओ क्लिपमुळे पिंपरी-चिंचवड शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक योगेश बहल चांगलेच अडचणीत सापडले आहेत. सोशल मीडियावरुन टीका करणाऱ्या एका तरुणाला ‘तुझा कार्यक्रम करेन’ अशी धमकी दिल्याचा आरोप योगेश बहल यांच्यावर करण्यात आला आहे. तशी ऑडिओ क्लिपलही सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात सध्या हा चर्चेचा विषय ठरला आहे.(Yogesh Behel is in trouble due to a viral audio clip)

योगेश बहल यांनी धमकी दिल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर दोन-तीन दिवसांतच या तरुणाच्या बाईकचा अपघात झाला. तो बहल यांनीच घडवून आणल्याचा आरोप श्याम घोडके या तरुणानं केला आहे. श्याम घोडके या तरुणाचा एक टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. घोडके याच्या आरोपानुसार योगेश बहल यांनी त्याला फोनवरुन धमकी दिली. त्यात ‘मर्यादेत राहिला तर बरं होईल, नाहीतर बायांच्या नादाला लागून तुझा कार्यक्रम होईल, मीच तो करेन’, असं बहल यांनी म्हटल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तरुणाकडून पोलिस संरक्षणाची मागणी

घोडके यांनी या प्रकरणाची तक्रार थेट पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांच्याकडे केली आहे. तसंच यावर तातडीने कारवाई करण्याची मागणीही करण्यात आलीय. आपल्या जिवाला धोका असून, आपलं काही बरंवाईट झाल्यास त्याला बहल जबाबदार असतील, असंही त्याने आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. घोडके यांनी फेसबुकवर काही कमेंट्स टाकल्या होत्या. त्यात त्याने वायबी (YB) असा उल्लेख केला होता. त्यावरुन हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे.

बहल यांनी आरोप फेटाळले

नगरसेवक योगेश बहल यांनी श्याम घोडकेचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. संबंधित क्लिप एडिट करण्यात आली आहे. संबंधित तरुणाविरोधात 19 ऑक्टोबर 2020 मध्ये पिंपरी पोलिसांत तक्रार अर्ज केला होता. त्यासंदर्भात मी त्याला तुझी सायबर सेलमध्ये तक्रार करेल असं सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असं योगेश बहल यांनी म्हटलंय.

तर या घटनेमुळं योगेश बहल घाबरले आहेत. त्यांची उत्तरे हास्यास्पद आहेत, असं संबंधित तरुणाने म्हटलंय. या प्रकाराबाबत आपण पोलीस आयुक्तांकडे अर्ज केल्याची माहितीही श्याम घोडके याने दिली आहे.

इतर बातम्या :

अंध महिलेला एक दिवसाच्या पोलीस आयुक्ताचा मान, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून अनोख्या पद्धतीने प्रजासत्ताक दिन साजरा

पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प : निवडणुकीच्या तोंडावरचा अर्थसंकल्प, शहरवासियांना काय मिळणार?

Yogesh Behel is in trouble due to a viral audio clip

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.