Pune News | पुणे शहरात सार्वजनिक नव्हे तर घरातील या गणपतीची आरास पाहण्यासाठी गर्दी, IPL चा सामना…

ganesh utsav 2023 | पुणे शहरात गणेश उत्सावाची धामधूम सुरु आहे. पहिल्या दिवशांपासून भाविक गणेस उत्सव पाहण्यासाठी बाहेर पडत आहे. आता पुणे शहरातील एक घरगुती गणेशाची केलेली आरस आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. आरास पाहण्यासाठी गर्दी होत आहे.

Pune News | पुणे शहरात सार्वजनिक नव्हे तर घरातील या गणपतीची आरास पाहण्यासाठी गर्दी, IPL चा सामना...
Image Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 21, 2023 | 12:29 PM

विनय जगताप, पुणे | 21 सप्टेंबर 2023 : पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून भाविकांची हजेरी असते. पुणे शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले देखावे पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक येतात. यामुळे अनेक गणेश मंडळांचे दर्शन २४ तास सुरु असते. पुणे शहरातील सार्वजनिक मंडळांचा असा उत्साह असताना घरगुती गणपतीही आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पुण्यातील धायरमध्ये मिलिंद पोकळे यांनी घरगुती गणपतीसमोर केलेला देखावा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहे.

काय साकारला आहे देखावा

पुणे येथील धायरीमधील मिलिंद पोकळे यांनी क्रिकेट सामन्याचा देखावा साकारला आहे. त्यांनी आपल्या घरातील गणपतीसमोर आयपीएल क्रिकेटची आरस तयार केली आहे. आयपीएलचा थरार एका रंगतदार सामन्यातून दिसत आहे. या आरासमध्ये प्रेक्षक गॅलरी तयार केली आहे. क्रिकेटर्सच्या माहितीचे दालन उभारले आहे. डे नाईट प्रकाशझोताचा सामना तयार करुन लाईव्ह प्रेक्षपणाची हुबेहूब मांडणी साकारली आहे.

खेळाडू म्हणून मूषक

गणरायचे वाहन असलेला मूषक खेळाडू म्हणून दाखवण्यात आले आहे. क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांना गणेशाच्या वेशभूषेत फलंदाजी करताना दाखवले आहे. तर मूषक यष्टिरक्षक, क्षेत्ररक्षण, गोलंदाजी करताना साकारले गेले आहेत. ही आरास पाहण्यासाठी सिंहगड रोडच नव्हे तर पुणे शहरातून भाविक गर्दी करत आहे. आगामी वनडे वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवा, अशी मागणी मिलिंद पोकळे कुटुंबियांनी गणरायाकडे केली आहे.

हे सुद्धा वाचा

कोणाची होती कल्पना

धायरी येथे कॉसमास बँकेचे संचालक मिलिंद पोकळे आणि जिजामाता महिला बँकेच्या माजी उपाध्यक्षा रेखा पोकळे यांचा मुलगा समर्थ याची ही कल्पना होती. त्याने घरातील वीस फुट लांबी रुंदीच्या हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम तयार केले आहे‌. गणेशोत्सवाच्या माध्यमातून देशभरात क्रिकेटसंदर्भात जागृती व्हावी, तसेच मुलांना क्रिकेटची जवळून ओळख व्हावी यासाठी ही आरस तयार केल्याचे समर्थ याने सांगितले. आरास पाहण्यासाठी येणाऱ्यांना समर्थ यासंदर्भातील माहिती देत असतो.

आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका
'तो लिंबू कापणारा चमत्कारी बाबा, त्यानं म्हातारपणात..', जरांगेंची टीका.
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!
मोदींच्या घरात खास पाहुण्याचं आगमन; नाव ऐकून तुम्हीही म्हणाल वाह!.
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?
मुख्यमंत्र्यांनी मराठ्यांसोबत दगाफटका केला तर..., जरांगेंचा इशारा काय?.
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल
'ते दिघेंच्या विचाराचे नाही तर बारमधील',ठाकरे गटातील नेत्याचा हल्लाबोल.
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला
हा सर्व धर्मराव आत्राम अन् त्यांच्या मुलीचा गेम, भाजप नेता काय म्हणाला.