AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टेंशन वाढवलं, महाराष्ट्रात H3N2 चा दुसरा रुग्ण दगावला

एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा बुधवारी नगरमध्ये H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसमुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. आता राज्यात दुसरा मृत्यू झाला आहे.

टेंशन वाढवलं, महाराष्ट्रात H3N2 चा दुसरा रुग्ण दगावला
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Mar 16, 2023 | 1:49 PM
Share

पुणे : महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. महाराष्ट्रात सध्या 170 हून अधिक रुग्ण H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसने बाधित रुग्णांची संख्या आहे. महाराष्ट्रातील दुसऱ्या H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये 73 वर्षीय वृद्धाचा H3N2 ने बाधित होऊन मृत्यू झाला आहे. यापूर्वी एमबीबीएसचे शिक्षण घेणार्‍या 23 वर्षीय तरुणाचा नगरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांची आता चाचणी केली जाणार आहे. या प्रकारामुळे राज्याचे टेन्शन वाढले आहे.

कोणाचा झाला मृत्यू

पुणे जिल्ह्यातील पिंपरी- चिंचवडमध्ये H3N2 पहिल्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 8 मार्चला ताप सर्दी असल्याने रुग्ण पिंपरी चिंचवडमधील वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. परंतु गुरुवारी उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. सध्या पिंपरी- चिंचवड शहरात ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.

राज्यात संख्या वाढली

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरस बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामध्ये पुण्यात सर्वाधिक रुग्ण असून छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकमध्ये रुग्ण आढळून येत आहे. राज्यात नगरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पिंपरी चिंचवडमध्येही एकाचा मृत्यू झाला.

आरोग्य विभाग अलर्ट

H3N2 इन्फ्लुएन्झा व्हायरसचा मृत्यू झाल्याने आता आरोग्य विभाग अलर्ट होत असतांना नागरिकांनीही काळजी घेण्याची गरज आहे. सर्दी ताप आणि खोकला अशी काही लक्षणे आढळून आल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्वाचे आहे. दुर्लक्ष न करता तात्काळ उपचार घेणे गरजेचे आहे.

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ