AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील 23 नव्या गावांच्या राजकारणात भाजपशी सरशी; उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका

Pune | या 23 गावांचा कारभार आपल्या हातात ठेवण्याच्या ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.पुणे महानगरपालिकेने यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महानगर नियोजन समितीला स्थगिती दिली.

पुण्यातील 23 नव्या गावांच्या राजकारणात भाजपशी सरशी; उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला झटका
मुंबई हायकोर्ट
| Edited By: Rohit Dhamnaskar | Updated on: Aug 04, 2021 | 11:00 AM
Share

पुणे: पुणे महानगरपालिकेत 23 गावे नव्याने समाविष्ट झाल्यानंतर सुरु झालेल्या राजकीय लढाईत ठाकरे सरकारला एक मोठा झटका बसला आहे. राज्य सरकारने या गावांच्या विकास आराखड्याचे (Development Plan) काम पालिकेला डावलून स्वतंत्र समितीकडे दिले होते. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारने घाईघाईने स्थापन केलेल्या महानगर नियोजन समितीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे या 23 गावांचा कारभार आपल्या हातात ठेवण्याच्या ठाकरे सरकारच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता आहे.पुणे महानगरपालिकेने यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने महानगर नियोजन समितीला स्थगिती दिली.

न्यायालयाच्या निर्णयानंतर पीएमआरडीएने प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या हद्दीमधील 800 गावांच्या विकास आराखड्यापैकी पुणे महापालिकेत समाविष्ट केलेल्या 23 गावांचा विकास आराखडा देखील थांबणार आहे. राज्य सरकारच्या या समितीवर बेकायदेशीररित्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत, आमदार तानाजी राऊत आदींना घेण्यात आल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे आता महाविकासआघाडी सरकार यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

विकास आरखड्यावर PMRDAने हरकती मागवल्या

पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या 23 गावांच्या विकास आरखड्यावर PMRDA कडून हरकती मागवण्यात आल्या आहेत. यासाठी 30 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. 29 जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पीएमारडीएच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी देण्यात आली होती. त्यानंतर 30 जून रोजी महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या 23 गावांचे नियोजन प्राधिकरण म्हणूनही पीएमारडीएची नियुक्ती करण्यात आली होती. या हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेऊन येत्या काही महिन्यात विकास आराखडा मंजूर केला जाईल, अशी माहिती पीएमआरडीए आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे पुण्यातील 23 नव्या गावांची जबाबदारी

राष्ट्रवादीच्या नगरसेवकांकडे नव्या तेवीस गावांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पुणे महापालिका क्षेत्राला लागून असलेल्या 23 गावांचा (Pune new 23 villages) महापालिकेत समावेश करण्याचा निर्णय गेल्या वर्षअखेरीस राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आदेशाने झाला होता. 23 गावांमधील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आल्याने पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वयासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संबंधित गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न करतील, अशी माहिती राष्ट्रवादीतर्फे देण्यात आली होती.

ती 23 गावे कोणती?

  1. खडकवासला
  2. किरकटवाडी
  3. कोंढवे धावडे
  4. मांजरी बुद्रूक
  5. नांदेड
  6. न्यू कोपरे
  7. नऱ्हे
  8. पिसोळी
  9. शेवाळवाडी
  10. काळेवाडी
  11. वडाची वाडी
  12. बावधन बुद्रूक
  13. वाघोली
  14. मांगडेवाडी
  15. भिलारेवाडी
  16. गुजर निंबाळकरवाडी
  17. जांभूळवाडी
  18. होळकरवाडी
  19. औताडे हांडेवाडी
  20. सणसनगर
  21. नांदोशी
  22. सूस
  23. म्हाळुंगे

संबंधित बातम्या :

पुण्यातील 23 नव्या गावांच्या कचरा व्यवस्थापनाचे नियोजन, PMPML कडूनही वाहतुकीची चाचपणी

पुण्यात भाजपची एकहाती सत्ता, पण कारभारी अजित पवार? राजकीय चर्चांना उधाण

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?.

‘अभी भी जिंदा हूं’ सोनम वांगचूक यांचा रुग्णालयातून पहिला व्हिडीओ समोर, सरकारला काय म्हटलं?

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.

…तर मंत्र्यांना स्पष्ट संदेश जाईल, अण्णा हजारेंचं पंतप्रधान मोदींना पत्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी