Pune crime | भोर हादरले 3 दिवसात आढळले 4 मृतदेह, 2 महिला, 2 पुरुषाचा समावेश

Pune crime | भोर हादरले 3 दिवसात आढळले 4 मृतदेह, 2 महिला, 2 पुरुषाचा समावेश
वार्ड प्रमुखाला अनेक महिने ओलीस ठेवल्याचा आमदारावर आरोप.
Image Credit source: tv9

पुण्यातील भोर तालुक्यात सलग तीन दिवसात 4 ठिकाणी मृतदेह आढळून आलेत, यात 2 महिला आणि 2 पुरुष मृतदेहांचा समावेशय.दोन महिलांचे मृतदेह नीरा नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरंगताना आढळून आलेत,तर एका पुरुषाचा मृतदेह भोर शहरालगत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलायं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 19, 2022 | 11:29 AM

विनय जगताप, पुणे – भोर तालुक्यात (Bhor) 3 दिवसात चार मृतदेह (Death ) आढळल्याची घटना घडली आहे. यामध्ये 2 महिला, 2 पुरुषाचा समावेश आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. या घटना घातपात की आत्महत्या(Suicide) आहेत याचा तपास भोर पोलीस करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार 3 आत्महत्या असल्याचं प्राथमिक अंदाज आहे ,तर एकाचं कारण अद्याप अस्पष्ट,पोस्टमॉरटम अहवाल  आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

नेमकं काय घडलं

पुण्यातील भोर तालुक्यात सलग तीन दिवसात 4 ठिकाणी मृतदेह आढळून आलेत, यात 2 महिला आणि 2 पुरुष मृतदेहांचा समावेशय.दोन महिलांचे मृतदेह नीरा नदीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तरंगताना आढळून आलेत,तर एका पुरुषाचा मृतदेह भोर शहरालगत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलायं. दुसऱ्या पुरुषाचा मृतदेह पुणे-महाड मार्गावरील 200 फूट खोल दरीत आढळून आलाय.यापैकी दोघांची ओळख पटलीयं, तर इतर दोघांची माहिती मिळवण्याचं कामं सुरूय.दरम्यान यात तिघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आलाय . चौघंचाही पोस्टमॉरटम अवहाल आल्यावर मृत्यूचे कारण स्पष्ट होणारेय.भोर पोलीस स्टेशनंचे कर्मचारी पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ निर्माण झाली आहे. य या घटनांचीच सर्वत्र चर्चा आहे. या घटना नेमक्या कोणत्या कारणामुळे घडल्या आहेत. तसेच त्या आत्महत्या आहेत की घातपात या चर्चांना उधाण आले आहे.

Photo : ‘देसी गर्ल’ आणि निकने केली रंगांची उधळण, विदेशातील कोणतं आहे ते मनमोहक ठिकाण?, पाहा प्रियंका-निकचे कलरफुल फोटो

Nashik | गुजरातच्या थापाड्यांनी Rajasthan सरकारच्या नावाचा वापर करून घातला 7 कोटींचा गंडा

ठाण्यात वाहतूक पोलिसावर हल्ला, ड्रिंक अँड ड्राईव्हची कारवाई केल्याचा संताप

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें