AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune Crime | पुण्यात पेईंग गेस्ट मुलींनी डीपॉझिट परत मागितल्याच्या रागातून घरमालकीणीची मुलींना मारहाण ; नेमकं काय घडलं

पीडित मुली पल्लवी चक्रनारायण (वय 20आणि रुचिता चक्रनारायण (वय21) या दोघीही चंदननगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होत्या. त्या भागातील रूम सोडताना त्यांनी घर मालकीण तृप्ती माने यांच्याकडे डीपॉझिटचे पैसे परत मागितले. मात्र आरोपी तृप्ती माने यांनी डिपॉझिट परत देण्याऐवजी मुलींसोबत चुकीचे वर्तन करत त्यांना रूममध्ये कोंडून ठेवले.

Pune Crime | पुण्यात पेईंग गेस्ट मुलींनी डीपॉझिट परत मागितल्याच्या रागातून घरमालकीणीची मुलींना  मारहाण  ; नेमकं काय घडलं
crimeImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Mar 03, 2022 | 10:36 AM
Share

पुणे – शहरातील पेईंग गेस्ट (Paying guest)मुलींनी डीपॉझिट (Deposit) परत मागितल्याच्या कारणावरुन पेईंग गेस्ट मुलींना कोंडून ठेवत घरमालकीणीने मारहाण केल्याच्या धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चंदननगर परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी घरमालकीण तृप्ती माने आणि श्वेता थोरात यांच्याविरुद्ध मारहाण केल्याची तक्रार चंदन पोलीस स्थानकात (Chandannagr Police station) दाखल करण्यात आले. पीडित पल्लवी चक्रनारायण (वय 20) आणि रुचिता चक्रनारायण (वय 21) मारहाण झालेल्या मुलींची नावं आहेत. घाबरलेल्या मुलीनी याबाबत चंदननगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याबाबात योग्य तो तपास करून कारवाई करण्यात केली जाणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

अशी घडली घटना

शहरात स्पर्धा परीक्षेसाठी , कॉलेजसाठी पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे.शहरातच्या अनेक भागात ही मुले वास्तव्य करत असतात. यामुळे स्थानिक नागरिकांना उत्पन्नाचेमोठे साधन निर्माण झालेलं आहे. मात्र याचाच गैरफायदा अनेकदा घरमालकांकडून घेतला जातो. पोलिसांनी दिलेल्या माहितनुसार पीडित मुली पल्लवी चक्रनारायण (वय 20आणि रुचिता चक्रनारायण (वय21) या दोघीही चंदननगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होत्या. त्या भागातील रूम सोडताना त्यांनी घर मालकीण तृप्ती माने यांच्याकडे डीपॉझिटचे पैसे परत मागितले. मात्र आरोपी तृप्ती माने यांनी डिपॉझिट परत देण्याऐवजी मुलींसोबत चुकीचे वर्तन करत त्यांना रूममध्ये कोंडून ठेवले, एवढंच नव्हे तर डिपॉझिट परत न देता श्वेता थोरात हिच्या मदतीने मारहाण केल्याचे उघड झाले आहे. यानंतर घाबरलेल्या मुलीनी याबाबतचंदन नगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. याबाबात योग्य तो तपास करून कारवाई करण्यात केली जाणारा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

घरमालकांचा मुजोरपणा

शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना अनेकदा महाविद्यालयाची हॉस्टेल फी परवडत नसल्याने पेईंग गेस्ट म्हणून राहतात. मात्र याचाच गैरफायदा घ घरमालकांकडून घेतला जातो. अनेकदा विद्यार्थ्यांची अडवणूक करून पैसे घेतले जातात. भाडयाच्या तुलनेत बेसिक सुविधाही दिल्या जात नसल्याचे समोर आले आहे.

Nagpur | विकास शुल्कात तीनपट वाढ, नासुप्रच्या विश्वस्त मंडळात विरोध, शुल्कवाढ थांबविण्यासाठी करणार काय?

शरीरातील ही लक्षणे वाढत्या कोलेस्ट्रॉलची तर चिन्हे नाहीत? दुर्लक्ष करु नका, अताच सावध व्हा !

BCCI Contracts: ‘या’ दोन क्रिकेटपटूंकडे बोर्डाने केलं साफ दुर्लक्ष, दोघांच कोट्यवधी रुपयांचं नुकसान

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...