Pune crime| बापरे! पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा दहावीतील मुलीवर चाकू हल्ला

एकतर्फी प्रेमातून तरुणाने इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर धारदार हत्याराने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Pune  crime| बापरे! पुण्यात एकतर्फी प्रेमातून तरुणाचा दहावीतील मुलीवर चाकू हल्ला
प्रेमप्रकरणातील मारहाणीत तरुणाचा मृत्यू
Image Credit source: tv9
योगेश बोरसे

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Mar 14, 2022 | 3:14 PM

पुणे –शहरात दिवसेंदिवस महिला , तरुणी व अल्पवयीन मुलींवरील ( minor girl) अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रेमाचे नाटक करत अल्पवयीन मुलीला प्रियकराने लुटले . ही घटना ताजी घटना ताजी असताना आज एकतर्फी प्रेमातून तरुणाने इयत्ता दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर धारदार हत्याराने हल्ला (attack)केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली आहे. घटनेनंतर मुलीला रुग्णालयात (hospital) दाखल केले असून तिच्यावर सिटी हॉस्पिटल वडगाव शेरी याठिकाणी उपचार सुरू आहे.

अशी घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडगाव शेरी येथे ही घटना घडली आहे. या घटनेत मुलीच्या पोटाला, हाताला गंभीर जखमा झाली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शास्त्रीनगर पोलीस करत आहेत. दुसरीकडे पुणे शहरात एका तरुणाने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवत मुलीशी जवळीक साधत तिची फसवणूक केली आहे. मुलीसोबत प्रेमाचे नाटक करत तरुणानं तुझ्या माझ्या लफड्याविषयी दोघांच्या घरी सांगेन असे म्हणत तिला ब्लॅकमेल(Blackmail) केले. यावरून मुलीला लुटल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकानरणी 19 वर्षीय तरुणावर सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ऋत्विक अशोक दिघे (वय 19, रा. दत्तनगर, कात्रज) याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत आनंदनगर येथील 17 वर्षीय तरुणीच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ही घटना 2019 ते मार्च2022 र्यंत सुरु असल्याची माहिती दिली आहे.

विकृतांची मजल इथपर्यंत

पुणे वडगाव शेरी एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेमातून चाकूने वार केल्याची घटना घडली आहे. मुलगी म्हणजे स्वतःची मालकी वाटावी इतपत विकृतांची मजल गेली आहे. पुणे शहर पोलिस तर गजब की पुलीस है. सत्ताधाऱ्यांच्या बलात्कारी पिलावळीला वाचवण्यात व्यस्त आहे अशी टीका भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षचित्रा वाघ यांनी केली आहे.

VIDEO | बॉम्ब कुठंय? धनंजय मुंडेंचे विधानसभेत हातवारे, विरोधकांना विचारणा, दंडही थोपटले!

VIDEO: बारामतीचा पोलीस तरुणीला लॉजवर घेऊन गेला, दुसऱ्याच्या बायकोच्या हातावर पोलिसाचा टॅटू; पडळकरांनी वाचला गुन्ह्यांचा पाढा

Viral : ‘मला खरं प्रेम मिळालं’ म्हणत कोट्यवधीचा मालक करणार 30 वर्ष लहान मुलीशी लग्न!

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें