Pune crime | शिक्रापूरमध्ये अल्पवयीन मुलीला दारू पाजून केला विनयभंग अन …

पीडित मुलीची मैत्रीण व सागर यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. दरम्यान त्याने पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीला घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर आपण नारायणपूरला देव दर्शनाला जाऊ माझ्यासोबत माझी पत्नीदेखील येत आहे, तुम्ही पण चला असे म्हणून कारमध्ये बसून घेऊन गेला. त्यानंतर शिक्रापूरपासून काही अंतर गेल्यानंतर सागर याने कोल्ड्रिक्स आणि दारू घेतली . त्यानंतर त्याने कारमध्ये बसून युवती व तिच्या मैत्रिणीला जबरदस्तीने दारू पाजली.

Pune crime | शिक्रापूरमध्ये अल्पवयीन मुलीला दारू पाजून केला विनयभंग अन ...
सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 9:11 AM

पुणे – जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवरील (Minor girls)अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. शिक्रापूर (Shikrapur) तालुक्यातून एका धक्कादायक घटनासमोर आली आहे. 17  वर्षीय अल्पवयीन मुलीला दारू पाजून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ओळखीतील तरुणाने हिणकस कृत्य केलं आहे. पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीसोबत देव दर्शनाला घेऊन जातो,असे सांगत तिला कारमध्ये बसवून नेले. त्यानंतर पीडित मुलीला जबरदस्तीने दारू पाजून तिचा विनयभंग करण्यात आला. शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आरोपीवर अॅट्रॉसिटीसह बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा (Crime of child sexual abuse with atrocities) दाखल करण्यात आला आहे.सागर सुनील वर्पे असे आरोपीचे नाव असून आरोपी सागर हा पीडित मुलीच्या ओळखीचा असल्याची माहिती मुलीने पोलिसांना दिली आहे.

तर घडलं अस की

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरूर तालुक्यातील करंदी येथे राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली होती. त्याच वेळी आरोपी सागर वर्पे हा चारचाकी कार घेऊन तिच्या मैत्रिणीच्या घरासमोर आला. पीडित मुलीची मैत्रीण व सागर यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते. दरम्यान त्याने पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीला घराबाहेर बोलावून घेतले. त्यानंतर आपण नारायणपूरला देव दर्शनाला जाऊ माझ्यासोबत माझी पत्नीदेखील येत आहे, तुम्ही पण चला असे म्हणून कारमध्ये बसून घेऊन गेला. त्यानंतर शिक्रापूरपासून काही अंतर गेल्यानंतर सागर याने कोल्ड्रिक्स आणि दारू घेतली . त्यानंतर त्याने कारमध्ये बसून युवती व तिच्या मैत्रिणीला जबरदस्तीने दारू पाजली. दारुचे सेवन केल्याने युवतीला काही त्रास होऊ लागला, दरम्यान त्याचवेळी सागर हा तिच्याशी अश्लिल चाळे करू लागला

सोशल मीडियावर फोटो व्हायरल करण्याची धमकी

आरोपी सागरने पीडित मुलीला तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत. ते मी सोशल मीडियावर व्हायरल करील अशी धमकी दिली. यावेळी पीडित मुलगी व तिच्या मैत्रिणीने आम्हाला घरी सोड, नाहीतर आम्ही घरी फोन करू असे म्हटले. त्यानंतर काही वेळाने दोघी मैत्रिणींना त्यांच्या घरी आणून सोडले. यानंतर पीडित युवतीने घडलेला सर्व प्रकार तिच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत फिर्याद दिली. सागर वर्पे यांच्यावर पूर्वी 2015 मध्ये एक , 2017 मध्ये तीन , 2019 मध्ये एक, आणि 2020 मध्ये एक असे गुन्हे शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये मध्ये दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

The kashmir files : ‘द काश्मीर फाइल्स’च्या वादावर नाना पाटेकरांचे भाष्य, काय म्हणाले नाना पाटेकर? का वाढतोय चित्रपटाचा वाद?

Viral होत असलेला Balloon Prankचा ‘हा’ Video पाहिला का? हसून हसून पोट दुखेल

Chanakya Niti | आचार्य चाणक्यांच्या मते या 3 परिस्थितींमध्ये, व्यक्तीचे जीवन अनेकदा वेदनादायक असते

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.