AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune rain : पुण्यात पावसाचा जोर राहणार कायम, ऑरेंज अलर्ट जारी करत हवामान विभागानं काय इशारा दिला? वाचा…

शहर आणि जिल्ह्याच्या लगतच्या घाट भागात गुरुवारपर्यंत मुसळधार पाऊस (24 तासांत 64.5 मि.मी. ते 115.4 मि.मी.) अतिवृष्टी (24 तासांत 115.5 मि.मी. ते 204.4 मि.मी. पाऊस) होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे.

Pune rain : पुण्यात पावसाचा जोर राहणार कायम, ऑरेंज अलर्ट जारी करत हवामान विभागानं काय इशारा दिला? वाचा...
धानोरी, पुणे येथे दाटून आलेले ढगImage Credit source: tv9
| Updated on: Sep 13, 2022 | 11:01 AM
Share

पुणे : पुणे शहरात आणखी 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे. आयएमडी येथील नेहा मदान यांनी याविषयी माहिती दिली आहे. शहरामध्ये बहुतांशी मध्यम (24 तासांत 15.5.5 मि.मी. ते 64.4 मि.मी.), घाट भागात (115.4 मि.मी. पर्यंत) तर काही ठिकाणी (204.4 मि.मी. पर्यंत) अतिवृष्टी (Heavy rain) होण्याची शक्यता आहे. दरम्यान, रविवारी अवघ्या काही तासांत सर्वाधिक पावसाची नोंद मगरपट्टा येथे जवळपास 100.5 मिमी झाली आहे. हवामान खात्याने शहरात आणखी तीन-चार दिवस 11 सप्टेंबरच्या पावसाप्रमाणेच जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे येथील हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी (Anupam Kashyapi) यांनी सांगितले, की लोकांनी सावधगिरी बाळगावी. कारण शहरातील तसेच जिल्ह्यातील रस्ते निसरडे झाले आहेत. अनेक ठिकाणी चिखलदेखील झाला आहे.

‘मोकळ्या जागेत जाऊ नये’

शहर आणि जिल्ह्याच्या लगतच्या घाट भागात गुरुवारपर्यंत मुसळधार पाऊस (24 तासांत 64.5 मि.मी. ते 115.4 मि.मी.) अतिवृष्टी (24 तासांत 115.5 मि.मी. ते 204.4 मि.मी. पाऊस) होण्याची दाट शक्यता त्यांनी वर्तवली आहे. सैल ओल्या मातीमुळे रस्त्यालगतची झाडे उन्मळून पडू शकतात. काही क्षणात आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे फांद्या पडू शकतात. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटावेळी मोकळ्या जागेत जाऊ नये, झाडांखाली आसरा घेऊ नये, असे कश्यपी म्हणाले.

पाणी तुंबणार?

सखल भागात येत्या तीन-चार दिवसांत पाणी तुंबण्याचा, तात्पुरता पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. लगतच्या डोंगराळ भागात दरड कोसळण्याच्याही घटना घडू शकतात. लोकांनी घाट परिसरात जाणे टाळावे, कारण पुढील दोन-तीन दिवसांसाठी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी करण्यात आला आहे, असे कश्यपी यांनी म्हटले आहे.

आर्द्र वातावरण

अरबी समुद्रातून येणारे जोरदार पश्‍चिमी वारे तसेच बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पुण्यासह महाराष्ट्राच्या काही भागांत आर्द्रता निर्माण झाली आहे. दरम्यान, सोमवारी दिवसाचे तापमान शिवाजीनगर आणि मगरपट्टासह पुण्यातील काही ठिकाणी जवळपास 30 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते. सोमवारी संध्याकाळी सॅटेलाइट इमेजेसमध्ये पुणे जिल्हा आणि शहराजवळ काळे ढग दाटून आले होते. आयएमडीच्या आकडेवारीनुसार रविवारी, मगरपट्टा येथे अवघ्या काही तासांत सर्वाधिक 100.5 मिमी पावसाची नोंद झाली, तर पाषाणमध्ये 74 मिमी, लोहगाव 66.4 मिमी, शिवाजीनगरमध्ये 38.7 मिमी आणि चिंचवडमध्ये 9.5 मिमी पावसाची नोंद झाली.

निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ
निष्ठावंत राहिले बाजूला, उपरेच लागले रडायला; पक्षांतराचा भावनिक खेळ.
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा
पुणे मनपा निवडणुकीवरून महायुतीत खडाजंगी, धंगेकरांचा भाजपवर थेट इशारा.
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे
खासदार पुत्राची 24 तासात माघार, पक्षाच्या आदेशानंतर उमेदवारी अर्ज मागे.
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?
निवडणुकीसाठी मुंबईतलं युती अन् आघाड्यांचे चित्र स्पष्ट! कोण कोणासोबत?.
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज
ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल, बंडखोरी रोखण्याचं मोठं चॅलेंज.
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप
पुण्यात न जिंकणाऱ्या जागा भाजप शिवसेनेला देतंय; धंगेकरांचा गंभीर आरोप.
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा
युतीबाबत निर्णय करा, अन्यथा..; शिंदेंच्या मंत्र्याचा भाजपला थेट इशारा.
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही
आठवलेंच्या नाराजीतही प्रेम, सन्मान केला जाईल! दरेकरांनी दिली ग्वाही.
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब
मुंबई पालिकेसाठी शिवसेना - भाजपच्या जागावाटपावर आज शिक्कामोर्तब.
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत
मनसे-उबाठा युतीतील जागावाटपावर उदय सामंत यांचे भाकीत.