Pune rain : मुसळधार पावसानंतर पुण्याची दैना! ठिकठिकाणी पाणीच पाणी, वाहतूककोंडी अन् बरंच काही…

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुडे, गाडकवाडी पाबळ केंदुर परिसरात पाऊसाचा जोर वाढल्याने वेळनदीला महापूर आला आहे. अशातच नदीपात्रातील केटीवेअर बंधारा फुटल्याने सर्वत्र पाणी झाले आहे.

Pune rain : मुसळधार पावसानंतर पुण्याची दैना! ठिकठिकाणी पाणीच पाणी, वाहतूककोंडी अन् बरंच काही...
पावसामुळे दुकानांमध्ये शिरलेले पाणी तसेच झाड कोसळण्याच्या घटनाImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 12, 2022 | 10:17 AM

पुणे : पुणे शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy rain) अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या आहेत. काल पुण्यात मुसळधार पाऊस झाला. संध्याकाळच्या वेळी दाट ढग दाटून आले. त्यानंतर झालेल्या पावसाने पुणेकरांना झोडपले. यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली, गैरसोय झाली. कारण पावसानंतर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी पाणी साचले त्याचबरोबर वाहतूककोंडीलाही (Traffic jam) सामोरे जावे लागले. काही ठिकाणी तर अक्षरश: दुचाकीदेखील वाहून गेल्याचे प्रकार घडले. पाषाण, पंचवटी, स्टेट बँक नगर येथे पहाटे दोन चारचाकी वाहनांवर झाड (Tree collapsed) कोसळले. अग्निशामन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आणि हे झाड बाजूला करण्यात आले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. तिकडे हडपसरमधील भाजी मंडईत पाणीच पाणी झालेले पाहायला मिळाले. गुडघाभर पाणी साचल्याने मंत्री मार्केटमधील विक्रेत्यांचे हाल झाले.

लोहगावातील परिस्थिती

लोहगाव-वाघोली मुख्य रोड दादाची वस्तीजवळ अद्याप रस्त्यावर पाणी साचून आहे. शाळकरी मुले, दुचाकीवरील महिला, पादचारी यांना पाण्यातून वाट काढत ये जा करावे लागत आहे. साचलेल्या पाण्यात खड्डा तयार झाल्याने दुचाकीवरील महिला आपल्या लहान बाळाला घेऊन जाताना तिची दुचाकी गाडी खड्ड्यात बंद पडली. मागून कारमधून आलेल्या एका व्यक्तीने तीला गाडीतून उतरून मदत केली. याच पाण्यात गेल्या महिन्यात एका तरुणाला जीव गमावावा लागला होता. तरीदेखील महापालिकेने अद्याप उपाय योजना केली नसल्याने नागरिक तीव्र असंतोष व्यक्त करत आहेत.

आंबेगावात पूर

आंबेगाव तालुक्यातील पारगाव धामणी रोडवर पुलावरून पाणी जात असताना दुचाकीवरून पाण्याच्या प्रवाहातून जात असताना पाण्याचा जोर वाढल्याने दुचाकीस्वार दुचाकीस वाहून जात असताना स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे थोडक्यात बचावला. त्यामुळे सर्वत्र पावसाचा जोर कायम असताना नागरिकांना धोकादायक पाण्यातून प्रवास करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

खेडच्या वेळनदीला पूर

खेड तालुक्याच्या पूर्व भागातील वरुडे, गाडकवाडी पाबळ केंदुर परिसरात पावसाचा जोर वाढल्याने वेळनदीला महापूर आला आहे. अशातच नदीपात्रातील केटीवेअर बंधारा फुटल्याने सर्वत्र पाणी झाले असून पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

वेळनदीला आला महापूर

मावळात धुके

लोणावळा परिसरात पाऊस थांबल्यानंतर सकाळच्या वेळी धुके मोठ्या प्रमाणावर पसरले. लोणावळ्यातील अंडा पॉइंट येथील परिसर धुक्यात हरवून गेला होता. या धुक्यामुळे वाहन चालकांना मात्र मोठी कसरत करावी लागली.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.