AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर का? एकनाथ शिंदेंना भेटण्यामागचं सांगितलं कारण

Ravindra Dhangekar : रवींद्र धंगेकर हे पुण्यातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आहेत. त्यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी महाविकास आघाडीकडून विजय मिळवला होता. आता रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, त्यावर त्यांनी मौन सोडलं आहे.

पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर शिवसेनेच्या वाटेवर का? एकनाथ शिंदेंना भेटण्यामागचं सांगितलं कारण
| Updated on: Jan 31, 2025 | 8:50 AM
Share

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळालच. पण आता निवडणूक निकालानंतर महायुती अधिक बळकट होत चालली आहे. महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा महायुतीकडे ओघ वाढला आहे. दररोज महायुतीमध्ये पक्ष प्रवेश झाल्याच्या बातम्या येत आहेत. महाविकास आघाडीत सर्वात जास्त नुकसान उद्धव ठाकरे गटाच होत आहे. उद्धव ठाकरे गटातून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंग सुरु आहे. ठाकरे गटातून बाहेर निघणारे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्या तुलनेत काँग्रेस आणि शरद पवार गटातून सत्ताधारी पक्षात जाणाऱ्यांची संख्या कमी आहे.

आता माजी आमदार आणि पुण्यातील काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर हे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा रंगली आहे. रवींद्र धंगेकर यांनी नुकतीच एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आता या भेटी संदर्भात त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “काल मी माझ्या कामासाठी एकनाथ शिंदे यांना भेटलो. माझं व्यक्तीगत काम होतं. कामानिमित्त मला त्यांना भेटायच होतं. पक्षात जाण्याविषयी काही चर्चा काही झाली नाही” असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

‘माझा प्रॉब्लेम होता, म्हणून मी भेटलो’

“मी शिवसेनेत जाणार नाही. आता घरात बसलोय. माझ्या कामानिमित्त भेटलो. राज्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत, या नात्याने भेटलो” असं रवींद्र धंगेकर म्हणाले. तुम्ही पुढच्या आठवड्यात शिवसेनेत प्रवेश करणार अशी बातमी आहे, या पत्रकारांच्या प्रश्नावर रवींद्र धंगेकर म्हणाले की, “माझा प्रॉब्लेम होता, म्हणून मी भेटलो. पुढच्या आठवड्यात काय, आज जाणार अशी बातमी आहे. पण मी काँग्रेसमध्येच राहणार आहे. मला वाटलं तर उद्या मी अजितदादांना भेटेन. माझी जुनी ओळख आहे”

पोटनिवडणुकीतील पराभवाचा हिशोब चुकता

2024 च्या विधानसभा निवडणुकीत कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या हेमंत रासने यांनी रवींद्र धंगेकर यांचा पराभव केला. या विजयासह रासने यांनी पोटनिवडणुकीतील पराभवाचा हिशोब चुकता केला. त्याआधी महाविकास आघाडीकडून पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले होते. त्यांनी रासने यांचा पराभव केलेला.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी