Video | कोल्हापुरात 50 शेतकऱ्यांचा 60 एकरातील ऊस जळून खाक, लाखोंचं नुकसान

कोल्हापूरमध्ये ऊसाच्या फडाला मोठी आग लागली. या आगीत तब्बल 60 एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. | Kolhapur Sugarcane Fire in 60 Acres

Video | कोल्हापुरात 50 शेतकऱ्यांचा 60 एकरातील ऊस जळून खाक, लाखोंचं नुकसान
Kolhapur Sugarcane Fire

कोल्हापूर :  कोल्हापूरमध्ये ऊसाच्या फडाला मोठी आग लागली. या आगीत तब्बल 60 एकरमधील ऊस जळून खाक झाला आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येतीय. (Kolhapur Sugarcane Fire in 60 Acres)

आजरा तालुक्यातील भादवण येथील उसाच्या शेतीला आग लागल्याची ही घटना आहे. गावच्या यात्रेच्या दिवशीच ही घटना घडली. त्यामुळे गावकऱ्यांच्या आनंदावर विरजन पडलं.

या आगीत सुमारे आठशे टन ऊस जळून खाक झाला आहे. 50 शेतकऱ्यांचं जवळपास 25 लाखांचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.  या आगीची दाहकता होती की सुमारे 3 ते 4 किलोमीटर परिसरात या धुरांचे लोट पसरले होते.  (Kolhapur Sugarcane Fire in 60 Acres)

पाहा व्हिडीओ :

 

हे ही वाचा :

पुरंदर विमानतळाची जागा बदलण्यास शिवतारेंचा विरोध, यशवंतराव चव्हाणांच्या दाखल्यासह पवारांना पत्र

मंत्र्याला हाकला, घरी पाठवा; चौकशी होत राहील; पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी निलेश राणे आक्रमक

Published On - 8:49 am, Sun, 14 February 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI