पुणे : गणेश स्थापना (Ganesh chaturthi) आणि विसर्जनाच्या दिवशी जिल्ह्यात दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिनांक 31 ऑगस्ट आणि 9 सप्टेंबर रोजी पूर्ण दिवस जिल्ह्यातील दारू दुकाने बंद राहणार (Liquor shops will remain closed) आहेत. 10 तारखेला विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत महापालिका क्षेत्रातील दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश आहेत. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशीही ज्या भागात गणेश विसर्जन असणार त्याभागातील दारू दुकाने बंद राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांनी हे आदेश दिले आहेत. शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी देशमुख यांनी हा आदेश जारी केला आहे. यासाठी अशा दुकानांवर वॉचही ठेवला जाणार आहे. कुठेही गैरप्रकार आढळल्यास किंवा आदेशाचे पालन न झाल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.