Sharad Pawar : राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का? शरद पवार यांनी काय सांगितले, काय दिले कारण

| Updated on: Apr 25, 2024 | 6:58 PM

Lok Sabha Election 2024 : राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर त्याची दोन शक्कलं झाली. बारामतीत आता पवार विरोधात पवार असा सामना रंगला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीतच सामना दिसत असला तरी शरद पवार विरुद्ध भाजप असा हा सामना आहे का, यासह अनेक प्रश्नांवर शरद पवार यांनी मत व्यक्त केले.

Sharad Pawar : राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का? शरद पवार यांनी काय सांगितले, काय दिले कारण
पक्ष फुटीमागे काय आहे कारण
Follow us on

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीत पण उभ्या देशानं फूट पाहिली. राष्ट्रवादी पक्ष फुटल्यानंतर पक्षांची दोन शक्कलं झाली. लोकसभा निवडणुकीत बारामतीत यंदा पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. 1967 पासून हा पवार कुटुंबियांचा बालेकिल्ला आहे. पण या बालेकिल्ल्यातच आता पवार विरुद्ध पवार अशी चुरस आहे. राष्ट्रवादीवरील वर्चस्वातून पक्ष फुटला का, अजितदादा यांनी यापूर्वी पण राष्ट्रवादीच्या विचारसरणीपेक्षा वेगळी भूमिका घेतलेली असताना त्यांना पुन्हा पक्षात का घेण्यात आले. यासह इतर अनेक प्रश्नांना ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत उत्तरं दिली.

वर्चस्वातून फुटला पक्ष?

राष्ट्रवादी पक्ष कशामुळे फुटला याची चर्चा नेहमी होते. राष्ट्रवादीवर वर्चस्व मिळवण्यासाठी ही फूट पडली का, या प्रश्नाला शरद पवार यांनी उत्तर दिले. वर्चस्वातून पक्ष फुटला नाही तर एजन्सींचे चौकशींचे जे उद्योग सुरु होते. त्यामुळे अनेक सहकारी अस्वस्थ झाल्याने त्यांनी हे कृत्य केल्याचे पवारांनी स्पष्ट केले. काही नेत्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत अवघड झाली होती. त्याचा किस्सा त्यांनी सांगितला. एका सहकाऱ्याच्या कुटुंबांची काय अवस्था झाली याचं उदाहरण देत, पक्ष फुटीची कारणं त्यांनी समोर आणली.

हे सुद्धा वाचा

जुन्या सहकाऱ्यांना संधी देणार का?

2019 मध्ये अजित पवारांनी पक्षापेक्षा वेगळी भूमिका घेतली होती. त्यानंतर ते परत आले. त्यांनी चूक कबूल केली आणि त्यांना संधी देण्यात आल्याचे पवारांनी स्पष्ट केले. अशीच भूमिका राष्ट्रवादीतील जुन्या सहकाऱ्यांबाबत घेणार का असा सवाल पवारांना विचारण्यात आला. त्यावेळी ते येतील तेव्हा पाहू असे सांगत, जोपर्यंत मोदी सत्तेत आहे, तोपर्यंत हे सहकारी परत येण्याची शक्यता नसल्याचे ते म्हणाले.

संविधानावर हल्ला होऊ शकतो

जर 400 च्यावर भाजपच्या जागा आल्या तर संविधान बदलणार असा आरोप शरद पवार यांनी अनेक सभेतून केला आहे. त्याविषयी विचारणा केली असता, पवारांनी विविध राज्यातील चार खासदारांची वक्तव्य काय आहेत याचं उदाहरण दिले. त्यांच्या वक्तव्यावरुन देशातील संविधान संकटात जाण्याची शकत्या नाकारता येत नाही, असे पवारांनी सांगितले.