राज्याच्या आरोग्य यंत्रणेत 442 नव्या रुग्णवाहिका दाखल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत 442 नव्या रुग्णवाहिका दाखल; उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
442 रुग्णवाहिकांचे अजित पवारांच्या हस्ते लोकार्पण

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे.

सागर जोशी

|

May 28, 2021 | 10:18 PM

पुणे : राज्यात कोरोना संकटाच्या काळात आरोग्य यंत्रणेतील अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. आता कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता अनेक तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. अशावेळी आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर राज्य सरकार भर देत आहे. त्याचाच भाग म्हणून राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत 442 रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आलं. (442 new ambulances introduced in the state health department)

राज्याची आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात 442 रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार उपलब्ध करण्यात आलेल्या निधीतून नवीन रुग्णवाहिकांची खरेदी करण्यात आली आहे. या रुग्णवाहिका राज्याच्या आरोग्य यंत्रणेत दाखल झाल्या आहेत. आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात आले. त्यापैकी पुणे विभागातील पुणे जिल्ह्यासाठी 12, सातारा जिल्ह्यासाठी 13, सोलापूरसाठी 9, कोल्हापूर जिल्ह्यासाठी 13 आणि सांगली जिल्ह्यासाठी 9 रुग्णवाहिकांचे आज वितरण करण्यात आलं. राज्यातील इतर जिल्ह्यांना त्यांच्या मागणी आणि गरजेनुसार रुग्णवाहिकांचे वितरण करण्यात येणार आहे.

ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसह ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचेही लोकार्पण

टाटा कंपनीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि 4 ऑक्सिजन जनरेशन प्लॅन्टचे अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयात लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, टाटा कंपनीचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.

लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवणार, 1 जूनला नवी नियमावली

पुण्यात आज कोरोनाचा आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वाची घोषणा केलीय. राज्यातील लॉकडाऊन अजून 15 दिवस वाढवण्यात आल्याची माहिती टोपे यांनी दिलीय. मात्र, त्याबाबतची नियमावली 1 जूनला जाहीर केली जाईल. तर शिथिलतेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली आहे. दरम्यान, पुण्यातील कोरोनास्थिती सुधारत आहे. रुग्णसंख्या कमी होतेय. पण पॉझिटिव्हीटी रेट अद्याप कमी नाही. अशावेळी टेस्टिंगची संख्या कमी होता कामा नये, अशी सूचना टोपे यांनी प्रशासनाला केलीय.

संबंधित बातम्या :

आंदोलनाला अजून 9 दिवस आहेत, मार्ग निघेल; अजित पवारांचे संकेत

Pune Lockdown update : पुण्यातील वीकेंड लॉकडाऊन उठवला, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

442 new ambulances introduced in the state health department

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें