AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बेळगावात सीमा प्रश्न चिघळला, दोन्ही राज्यांकडून एसटी बंद केल्याने प्रवाशांचे हाल

बेळगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाडीला काळे फासल्याने तणाव निर्माण झाला (Maharashtra Karnataka Border Dispute).

बेळगावात सीमा प्रश्न चिघळला, दोन्ही राज्यांकडून एसटी बंद केल्याने प्रवाशांचे हाल
maharashtra karnatak border dispute
| Updated on: Mar 13, 2021 | 3:03 PM
Share

सांगली : बेळगावमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या गाडीला काळे फासल्याने तणाव निर्माण झाला (Maharashtra Karnataka Border Dispute). महाराष्ट्र आणि कर्नाटक आगारच्या एसटी बंद झाल्याने वडापने प्रवास करण्याची वेळ आली आहे (Maharashtra Karnataka Border Dispute Both States Stop ST Bus Service After The Belgaum Attack On Shivsena Ambulance).

बेळगावमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख्याच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये एसटी आगाराकडून कर्नाटक राज्यातील बस सेवा बंद ठेवण्यात आली आहे. तसेच, कर्नाटक राज्यानेही महाराष्ट्रातील बस वाहतूक बंद ठेवली आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय निर्माण झालेली आहे.

कन्नड रक्षिक वेदिक संघटनेकडून कर्नाटकच्या बेळगावमध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख्याच्या गाडीवर हल्ला करत फलक फाडल्याचे संतप्त पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर कर्नाटक आणि महाराष्ट्र बस सेवेवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर सांगली एसटी आगाराकडून मिरजेतून आणि सांगलीतून कर्नाटक राज्यकडे जाणारी बस वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. एसटी बस याचे नुकसान होवू नये, यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक आगाराच्या एसटी फेऱ्या तात्काळ बंद करण्यात आल्या आहेत.

रोज महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या एसटीच्या 25 फेऱ्या कर्नाटक राज्यात मध्ये होत होत्या. त्या सर्व बंद करण्यात आल्या आहेत. कर्नाटक राज्यातून ही तितक्याच फेऱ्या महाराष्ट्रात होत होत्या त्यासर्व फेऱ्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून नाईलाजाने त्यांना वडाप वाहतुकीने प्रवास करण्याची वेळ आली आहे.

पाहा व्हिडीओ :

Maharashtra Karnataka Border Dispute Both States Stop ST Bus Service After The Belgaum Attack On Shivsena Ambulance

संबंधित बातम्या :

कर्नाटकच्या परिस्थितीला केंद्र सरकारच जबाबदार, मोदी-शहा गप्प का?; संजय राऊत यांचा सवाल

बेळगावात शिवसेनेच्या रुग्णावाहिकेला काळे फासण्याचा प्रयत्न, सीमाभागात तणावाचं वातावरण

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.