Sachin Ahir | पुणे-पिंपरी चिंचवड मित्रपक्षाला पूर्णपणे सोडला नाही, अहिरांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

Sachin Ahir | पुणे-पिंपरी चिंचवड मित्रपक्षाला पूर्णपणे सोडला नाही, अहिरांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा
Sachin Ahir

आगामी महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, नाही आले, तर आम्ही स्वबळावर आणि पक्ष संघटनेच्या जीवावर काम करु, असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते.

रणजीत जाधव

| Edited By: अनिश बेंद्रे

Dec 10, 2021 | 7:59 AM

पिंपरी चिंचवड : महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही आहोत, त्यामुळे आम्ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड (Pune Pimpri Chinchwad) आमच्या मित्रपक्षाला पूर्णपणे सोडून दिला नाही, असा सूचक इशारा शिवसेनेचे (Shiv Sena) पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) दिला आहे. जवळपास अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीला रामराम ठोकर सचिन अहिरांनी शिवबंधन हाती बांधले होते. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना विधानसभा निवडणूक (Worli Vidhansabha) जिंकून देण्यात अहिर यांचा मोलाचा वाटा मानला जातो.

काय म्हणाले सचिन अहिर?

आगामी महापालिका निवडणुकीत मित्रपक्ष सोबत आले तर ठीक, नाही आले, तर आम्ही स्वबळावर आणि पक्ष संघटनेच्या जीवावर काम करु, असं मत सचिन अहिर यांनी व्यक्त केलं. पिंपरी-चिंचवड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत अहिर बोलत होते.

“शंभर टक्के लढू किंवा 70-80 टक्के लढू, आज काही भाकित करणं उचित ठरणार नाही, कारण प्रभागाच्या रचना कशा होत आहेत, कसे उमेदवार आहेत, कारण काही काम करणारे उमेदवार आमच्या डोळ्यासमोर आहेत, पण तिथे आरक्षण पडलं, तर काय याचा विचार करावा लागेल” असंही सचिन अहिर म्हणाले.

“सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाच्या बाबत दिलेला निर्णय धक्कादायक म्हणावा लागेल, कारण तो स्थगित करुन नवीन निवडणूक घ्यायला सांगितलं आहे, असं होत नाही काही वेळा. नगरपालिकेच्या निवडणुका वेळेवर होतील, की त्याही स्थगित होतील, हाही प्रश्न आमच्यासमोर आहे” असं सचिन अहिर यांनी सांगितलं.

सेनाप्रवेशावेळी केलेलं ‘ते’ वक्तव्य

शरद पवार माझ्या ह्रदयात आहेत, तर उद्धव आणि आदित्य माझ्या शरीरात राहतील. आपण राष्ट्रवादी फोडण्याचं काम करणार नाही, पण शिवसेना वाढवण्याचं काम नक्की करु, असं सूचक वक्तव्य जुलै 2019 मध्ये शिवसेनाप्रवेशावेळी सचिन अहिर यांनी केलं होतं.

सचिन अहिर कोण आहेत?

 • सचिन अहिर यांनी जुलै 2019 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला.
 • आदित्य ठाकरेंच्या विजयात मोठा वाटा असलेल्या अहिर यांची 2020 मध्ये शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती
 • सेनाप्रवेशापूर्वी अहिर यांचा राष्ट्रवादीत मोठा दबदबा होता.
 • 1999 मध्ये सचिन अहिर पहिल्यांदा आमदार झाले
 • मामा अरुण गवळी यांनी सचिन अहिर यांना शिवडी विधानसभा मतदारसंघातून निवडून आणलं.
 • काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात 2009 मध्ये सचिन अहिर गृहनिर्माण राज्यमंत्रीपदी विराजमान झाले.
 • अहिरांकडे वाहतूक आणि पर्यावरणासोबतच संसदीय कामकाजाचाही अतिरिक्त पदभार देण्यात आला होता.
 • 2014 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव झाला.
 • शिवसेनेचे आमदार सुनिल शिंदे यांनी वरळी मतदारसंघात अहिर यांचा पराभव केला होता.
 • सचिन अहिर यांना राष्ट्रवादीने मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी दिली होती.
 • अहिर यांनी मुंबईतील गिरणी कामगारांच्या प्रश्नांवर राष्ट्रीय मिल मजदूर संघात काम केले आहे.
 • इंटक कामगार युनियनचे अध्यक्षपदही सचिन अहिर यांनी भूषवले आहे.

संबंधित बातम्या :

विधान परिषदेच्या 2 जागांसाठी मतदान, अकोला नागपूरमध्ये शिवसेना भाजपसह काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला

मुंबई महापालिकेत रिपाइंचे 25 नगरसेवक निवडून आणा; आठवलेंनी सांगितला भाजपसोबतच्या युतीचा फॉर्म्युला

काँग्रेसवर उमेदवार बदलण्याची नामुष्की, छोटू भोयर ऐवजी मंगेश देशमुखांना पाठिंबा जाहीर

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें