Pune Lockdown Update:पुण्यात कडक लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा

Pune Lockdown Update:पुण्यात कडक लॉकडाऊन करण्यात आलं असून अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद ठेवण्यात आली आहेत. Pune Weekend Lockdown essential commodities also closed

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:54 PM, 17 Apr 2021
Pune Lockdown Update:पुण्यात कडक लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा
राजेंद्र शिसवे, सह.पोलीस आयुक्त, पुणे

पुणे: पुण्यात लॉकडाऊन कडक करण्यात आला असून संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुण्याचे सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेतली दुकानेही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. अपवाद फक्त मेडिकलची दुकानं असतील. पुण्यात काही व्यापाऱ्यांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवत दुकानं सुरु ठेवली होती. त्यापार्श्वभूमीवर पोलिसांचा हा आदेश महत्वाचा आहे. (Maharashtra Pune Weekend Lockdown all shops including essential commodities also closed except Medicals said by Ravindra Shisve)

एएनआय वृत्तसंस्थेचं ट्विट 

पुण्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहणार

पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पुण्यात आता शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकान सुरु ठेवण्यास परवानगी आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा 

डॉ. रवींद्र शिसवे यांनी वीकेंड लॉकडाऊनबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत करताना जे लोक संचारबंदीचे नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. पुणे पोलिसांच्या इशाऱ्याचा पुणेकर नागरिकांकवर किती परिणाम होतो, हे पाहावे लागणार आहे.


पुण्यात नागरिकांकडून संचारबंदींचं उल्लंघन

पुण्यात कोरोना आरोग्य यंत्रणा हतबल झालेली असताना, काही अतिउत्साही पुणेकरांना घराबाहेर पडण्याचा मोह आवरता येत नाहीये. वीकेंड लॉकडाऊनच्या दिवशीही संचारबंदीच्या नियमांचे उल्लघंन काहीनी केल्याचं पाहायला मिळालं आहे.

तर, मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल, अजित पवार यांचा  इशारा

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे शुक्रवारी म्हणाले होते की, “पुणेकरांनी मागच्यावेळी शनिवार रविवारच्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला होता. तेव्हा मी पण त्यांचं कौतुक केलं. आता यावेळीही शनिवार रविवार दोन दिवस पुणेकर हीच गोष्ट दाखवतील. एकंदरित मागच्यावेळी लॉकडाऊन होतं तेव्हा बऱ्याच लोकांना बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यावेळी आपण खूप मोठा काळ थांबलो. मात्र, दुसऱ्या लाटेत पहिल्या लाटेपेक्षा कोरोना बाधितांची संख्या वाढलीय. त्यामुळे कठोर वाटतील असे निर्णय घेण्याची वेळ आली. म्हणूनच नागरिकांना सहकार्याची भूमिका घ्यावी. गुरुवारी (15 एप्रिल) माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनीही सांगितलंय की दोन दिवसांचा लॉकडाऊन पाळला नाही तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन आणावा लागेल, तशी वेळ येऊ नये अशी विनंती आहे.”

संबंधित बातम्या

VIDEO | पुण्यात मनसे नगरसेवकाने करुन दाखवलं, हॉटेलच्या हॉलमध्ये 40 ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल

… तर मागच्या सारखा कडक लॉकडाऊन लावावा लागेल : अजित पवार