गोकुळच्या रणसंग्रामात नवा ट्विट्स! प्रकाश आवाडेंची तिसरी आघाडी, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे तिसरी आघाडी करणार आहेत.

गोकुळच्या रणसंग्रामात नवा ट्विट्स! प्रकाश आवाडेंची तिसरी आघाडी, तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार?
गोकुळ दूध संघ निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांची तिसऱ्या आघाडीची घोषणा

इचलकरंजी : कोल्हापूरवासियांसह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या आणि जिल्ह्याचं आर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे तिसरी आघाडी करणार आहेत. जिल्ह्यातील दूध उत्पादक संघासाठी बऱ्याच जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना एकत्रित घेऊन तिसरी आघाडी तयार करणार असल्याचं आवाडे यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीपूर्वी जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे.(MLA Prakash Awade will form the third front in the Gokul Dudh Sangh elections)

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची राजर्षी शाहू शेतकरी आघाडी विरुद्ध महादेवराव महाडिक आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या आघाडीमध्ये ही निवडणूक होणार हे स्पष्ट होतं. पण आता आमदार प्रकाश आवाडे यांनी तिसरी आघाडी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे या निवडणुकीत अधिक रंगत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

सतेज पालटांना धक्का

पालकमंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू शेतकरी आघाडीत अवघ्या चार दिवसात फूट पडली. माजी आमदार सत्यजित पाटील सरुडकर यांनी आघाडीची साथ सोडण्याची घोषणा केली आहे. आमदार पी एन पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर सरुडकरांनी निर्णय जाहीर केला. गोकुळ निवडणुकीत सत्ताधाऱ्यांसोबत राहणार असल्याचं सरुडकरांनी स्पष्ट केलंय.

..तर 10 लिटर दूध न दमता काढून दाखवा, राजू शेट्टींचं चॅलेंज

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलेली एक मागणी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. संचालकपदाची निवडणूक लढवणाऱ्यांना एका दमात 10 लीटर दूध काढता, यायला हवं, अशी अट ठेवायला पाहिजे होती. या निवडणुकीसाठी कोल्हापुरातील बड्या राजकीय नेत्यांची मुलं रिंगणात उतरली आहेत. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी हा खोचक टोला लगावला.

गोकुळ दूध संघ का आहे महत्त्वाचा?

दूध संघाचा जिल्ह्यात आणि राज्यात लौकिक

रोज 30 ते 35 लाख लिटर दुधाचं संकलन

मुंबई पुण्यासह अनेक मोठ्या शहरात गोकुळ दुधाला मागणी

गोकुळची रोजची कोट्यवधीची उलाढाल

गोकुळ दूध संघावर सत्ता म्हणजे जिल्ह्यात वर्चस्व असा अलिखित प्रघात

कसा असेल निवडणूक कार्यक्रम?

25 मार्च ते 1 एप्रिल – उमेदवारी अर्ज भरणे 5 एप्रिल – उमेदवारी अर्जाची छाननी 6 एप्रिल – वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे 6 ते 20 एप्रिल – उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा कालावधी 22 एप्रिल – उमेदवारांना चिन्हांचे वाटप 2 मे – मतदान 4 मे – मतमोजणी

संबंधित बातम्या :

गोकुळ निवडणूक : सतेज पाटलांना धक्का, माजी आमदाराने चार दिवसात आघाडी सोडली

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचं बिगुल अखेर वाजलं, 2 मे रोजी मतदान

MLA Prakash Awade will form the third front in the Gokul Dudh Sangh elections

Published On - 7:58 pm, Thu, 1 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI