AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PMP Bus: सीएनजीच्या थकीत बिलाचा भरणा न केल्यास पुरवठा बंद करू, एमएनजीएलचा पुणे परिवहन महामंडळाला इशारा

पुणे महानगर परिवहन महामंडळा प्रशाशनाकडं एकूण 35 कोटीची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने भरण्यात यावी अन्यथा सीएनजीचा पुरवठा थांबवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. येत्या 14 जून पासून हा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामुळे बिलाचा भरणा ना झाल्यास तब्बल अकराशे बसेस सीएनजीच्या पुरवठ्या अभावी जागेवरच उभय राहतील अशी भीती निर्माण झाली आहे.

PMP Bus: सीएनजीच्या थकीत बिलाचा भरणा न केल्यास पुरवठा बंद करू,   एमएनजीएलचा पुणे परिवहन  महामंडळाला इशारा
पुण्यातील पीएमपीएमएल बस सेवाImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jun 07, 2022 | 3:17 PM
Share

पुणे – शहरातील लोकल वाहतुकीचा कणा म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (PMP) पहिले जाते. शहरात वाहतुकीसाठी मोठ्याप्रमाणात बसेस ( Bus) वापरल्या जातात. मात्र आता पीएमपीला सीएनजी(पुणे महानगर परिवहन) पुरवठ्याबाबत मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएलची) थकीत बिले ना भरल्याने सीएनजी पुरवठा बंद करण्याचा इशारा एमएनजीएलने दिला आहे. पुणे महानगर परिवहन महामंडळा प्रशाशनाकडं एकूण 35 कोटीची थकबाकी आहे. ही थकबाकी तातडीने भरण्यात यावी अन्यथा सीएनजीचा पुरवठा थांबवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. येत्या 14 जून पासून हा पुरवठा बंद करण्यात येणार आहे. यामुळे बिलाचा भरणा ना झाल्यास तब्बल अकराशे बसेस सीएनजीच्या पुरवठ्या अभावी जागेवरच उभय राहतील अशी भीती निर्माण झाली आहे.

किती आहेत बसेस

पुणे परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण अठराशे बसेस आहेत. त्यातील जवळपास अकराशे बसेसया सीएनजीवर चालवल्या जातात. यापैकी 300  बसेस या स्वतः पीएमपीच्या आहेत तर 200 बसेस कंत्राटी पद्धतीने चालावल्या जातात. याचबरोबर उरलेल्या बसेस भाडेतत्त्वावर चालवायला जातात. या बसेसना एमएनजीएल कडून सीएनजीचा पूरवठा केला जातो. मात्र गेल्या काही काही काळात एमएनजीएलचे तब्बल35 थकबाकी पीएमपीकडे आहे. थकबाकी भरण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. मात्र अद्यापही थकबाजी भरण्यात आलेली नाही

प्रवाशांची अडचण होणार नाही

सीएनजीच्या पुरवठ्यापोटी पीएमपीने काही रक्कम यापूर्वी एमएनजीएलकडे भरली. आताही पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे निधीची मागणी करण्यात आली आहे आणि हा निधी उपलब्ध झाल्यावर तातडीने सीएनजीची बिले भरण्यात येतील, आणि प्रवाशांची अडचण होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रविण आष्टीकर यांनी दिली आहे.

रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.