MPSC Exam Result | शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम

MPSC Exam Result | कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राहणाऱ्या विनायक पाटील याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्याला 622 गुण मिळाले तर धनंजय पाटील 608 गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये पहिली आलेली पूजा वंजारी हिला 570 गुण मिळाले.

MPSC Exam Result | शेतकऱ्याचा मुलगा एमपीएससी परीक्षेत राज्यात प्रथम
vinayak patil
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 9:43 AM

कोल्हापूर, दि.19 जानेवारी 2024 | महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) घेतलेल्या राज्यसेवा (मुख्य) परीक्षा 2022चा निकाल गुरुवारी जाहीर झाला. या परीक्षेत ग्रामीण भागातील मुलाने राज्यात बाजी मारली. शेतकऱ्याचा मुलगा राज्यात प्रथम आला. विनायक नंदकुमार पाटील यांनी 622 गुण पटकावत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला. मुलींमध्ये पूजा वंजारी हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर मागासवर्गीय प्रवर्गातून धनंजय बांगर राज्यातून पहिला आला आहे. राज्यात धनंजय बांगर (608) हा दुसरा आला. तर सौरभ गावंदे (608) याने तिसरा क्रमांक मिळवला. गणेश दत्तात्रय दिघे (605) चौथा तर शुभम गणपती पाटील (603) आला.

मुलाखतीनंतर काही तासांत निकाल

राज्य मुख्य परीक्षा 2022 च्या निकालात यंदा कोल्हापूर जिल्ह्याने बाजी मारली. कोल्हापूर जिल्ह्यातील विनायक पाटील यांनी 622 गुण मिळवत राज्यात प्रथम क्रमांक पटकवला. उपजिल्हाधिकारी, डिवायएसपी आणि तहसीलदार या संवर्गातील 623 जागांसाठी ही भरती प्रक्रिया घेण्यात आली होती. 18 जानेवारी 2023 गुरुवारी परीक्षेनंतर निवड झालेल्या उमेदवारांची मुलाखत झाली होती. त्याच दिवशी काही तासातच अंतिम निकाल जारी करण्यात आला. या मुलाखतीनंतर त्याची अंतिम यादी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

शेतकऱ्याच्या मुलाचे यश

कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राहणाऱ्या विनायक पाटील याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्याला 622 गुण मिळाले तर धनंजय पाटील 608 गुणांसह राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुलींमध्ये पहिली आलेली पूजा वंजारी हिला 570 गुण मिळाले. विनायक पाटील यांचे वडील शेती करतात. त्यांनी राज्यसेवेच्या दुसरा प्रयत्नात हे उल्लेखनीय यश मिळवले. पहिल्या प्रयत्नातून उपशिक्षणाधिकारी पदासाठी त्यांची निवड झाली होती. त्याचे शिक्षण पुणे येथील फर्ग्रसन महाविद्यालयात झाले. संख्याशास्त्र विषयात त्यांनी पदवी मिळवली. त्यांच्या या यशानंतर त्यांच्या गावात जल्लोष करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

आता होणार पसंतीक्रमाची प्रक्रिया

एमपीएससी परीक्षेचा निकाल आल्यानंतर आता पसंतीक्रमाची प्रक्रिया सुरु होणार आहे. २२ जानेवारीपासून ही प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांना त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.