‘जामतारा’ वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट

कॉम्पुटर आणि मोबाईल सॉफ्टवेअर वरुन व्हॉईसमेल पाठवत अमेरिकन नागरिकांची फसवणूक करण्यात आली (Gang loots American Lonavala Jamtara )

'जामतारा' वेब सिरिज पाहून मुंबईच्या टोळीने प्लॅन आखला, लोणावळ्यात बसून अमेरिकेतील नागरिकांची लूट
Follow us
| Updated on: May 21, 2021 | 11:54 AM

पिंपरी चिंचवड : ‘जामतारा’ वेब सिरिज (Jamtara Web Series) पाहून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करणारी आंतरराष्ट्रीय टोळी पुणे जिल्ह्यात जेरबंद करण्यात आली. बंगल्याच्या दारासमोर गांजाची शेती करणार्‍या मुंबई-ठाणे परिसरातील 15 जणांना पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मलमइमं आणि गजमद या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून इंटरनेटचा वापर करुन अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक करुन ही टोळी बेकायदेशीररित्या हवालाकरवी पैसे जमा करत असल्याचं पोलिसांना समजलं होतं. (Mumbai Gang loots American Citizens From Lonavala after watching Jamtara Web Series)

लोणावळ्यातील बंगल्यातून व्हॉईसमेल 

मौजे वाकसई लोणावळा येथील इंद्रायणी सोसायटी मधील प्लॉट नंबर 15 मध्ये कौशल जगदीश राजपुरोहित यांच्या मालकीचा सुरावत विल्ला हा बंगला आहे. या बंगल्यात विनोद सुभाषचंद्र राय आणि त्याचे सहकारी कॉम्पुटर आणि मोबाईल सॉफ्टवेअर वरुन व्हॉईसमेल पाठवत असल्याची माहिती एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांना मिळाली होती.

अमेरिकन नागरिकांना कारवाईची खोटी भीती

जुलै 2020 ते आजपर्यंत एकत्रित संगनमताने सुरावत विल्ला बंगल्यामध्ये इंटरनेट आणि संगणक तसेच मोबाईल फोन आणि सॉफ्टवेअरचा उपयोग करुन या टोळीने यूएसए मधील नागरिकांचे मोबाईल नंबर, नाव आणि इतर माहिती बेकायदेशीरपणे मिळवली. या माहितीच्या आधारे अमेरिकन नागरीकांना त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा खोटा व्हॉईस मेल पाठवण्यात येत असे. त्यांना घाबरवून आरोपी गिफ्ट कूपन देण्यास भाग पाडत. स्वतःची आर्थिक प्राप्ती करुन घेत या टोळीने फिशिंग केले आहे.

कौशल जगदीश राजपुरोहीत याच्या मालकीच्या आणि सध्या विनोद सुभाष राय याच्या ताब्यात असणाऱ्या सुरावत विल्ला बंगल्याच्या आवारात बेकायदा बिगर परवाना 430 ग्रॅम वजनाची आणि 6 हजार रुपये किंमतीची सात गांज्याची झाडे होती.

कोणाकोणाला अटक

या माहितीच्या आधारे अभिनव दिपक कुमार (मीरा रोड), निनाद नंदलाल देवळेकर (बदलापूर, मुळगाव गुहागर), राकेश अरुण झा (नवी मुंबई), शंतनू शाम छारी (मिरा रोड), दीप प्रिन्स चक्रवर्ती (नालासोपारा), निलेश बेल्जी पटेल (मालाड), विनोद सुभाषचंद्र राय (विरार), शाहीद शोएब खान (मिरा भाईंदर), इम्तेखाब निजामुद्दीन शेख (मालाड), गौरव देवेंद्र वर्मा (बोरीवली), बाबु राजू सिंग (मिरा रोड), विनायक धनराज उचेडर (कांदिवली), अभिषेक संजय सिंग (मीरा रोड), मोहम्मद झमा अख्तरहुसेन मिर्झी (मिरा रोड), शैलेश संजय उपादयाय (मालाड) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

संबंधित बातम्या :

उधारीवरुन मित्रांमध्ये वाद, भरचौकात सुरीने भोसकून 26 वर्षीय तरुणाची हत्या

पत्नीचे मसाज पार्लरमधील ग्राहकाशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पतीची भलतीच करामत

(Mumbai Gang loots American Citizens From Lonavala after watching Jamtara Web Series)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.