‘डीजेची वरात, बाराच्या भावात’; नगरमध्ये विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा दाखल, डीजे जप्त

नगरला रात्री लग्नाची वरात काढून डीजेच्या तालावर विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. | nagar police Action dance without masks

'डीजेची वरात, बाराच्या भावात'; नगरमध्ये विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा दाखल, डीजे जप्त
कोरोना काळात डीजेवर विनामास्क नाचणं महागात...
Follow us
| Updated on: Mar 17, 2021 | 2:06 PM

अहमदनगर : नगरला रात्री लग्नाची वरात काढून डीजेच्या तालावर विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोरोना प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष करत गर्दी जमवून अनेकांनी डीजेच्या तालावर ठेका धरला होता. याप्रकरणी वरपित्यासह डीजे चालकावर नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  करण्यात आलाय. तसेच डीजेही जप्त करण्यात आलाय. (Nagar police Action Against who dance without masks)

नगर तालुक्यातील चास शिवारात अकोळनेर रस्त्यावर ही घटना घडली. लक्ष्मण नामदेव कार्ले यांच्या मुलाचे लग्न होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही डामडौल करत रात्री नवरदेवाची वरात काढली. यासाठी डीजे लावला गेला.

डीजेच्या गाण्यावर अनेकांनी गर्दी करून विनामास्क ताल धरला होता. पोलिसांना हे प्रकरण कळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरिक्षक राजेंद्र सानप यांचे पथक दाखल झाले. पोलिसांना पाहून अनेकांची पळापळ झाली. मात्र पोलिसांनी विनामास्क नाचणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला.

नगरच्या गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच

अहमदनगर शहरात कोरोना वाढत असल्याने शहरातील गर्दीवर दक्षता पथकांचा वॉच राहणार आहे. तर पालिकेकडून चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई होणार आहेय. तसेच कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरातील दहा ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे.

नगरमध्ये कंटेन्मेंट झोन कुठे कुठे?

नगर शहरातील माणिकनगर, विनायक नगर, सारसनागर, केडगाव तसेच बोल्हेगाव येथे 3 तर सावेडी परिसरात 3 आशा 10 ठिकाणी मिनी कॅन्टेन्मेंट झोन तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता 28 मार्च पर्यंत याठिकाणी विविध निर्बंध घालण्यात आले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, या भागातील रहदारी आणि वाहने वापरण्यास मज्जाव करण्यात आला आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यावर संबंधितावर कायदेशीर कारवाई होईल, असे महानगरपालिका आयुक्त शंकर गोरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, बाहेर पडताना मास्क-सॅनिटायझर वापरावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

नियम मोडणाऱ्या नागरिकांकडून आर्थिक दंड

मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून यात सरकारी कर्मचारी देखील आहेत. तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना पाहून अनेकांची धावपळ उडालीय. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून महिनाभरात 83 लाख दंड वसूल करून 66 हजार नागरिकांवर कारवाई करण्यात आलीये. तर 15 दिवसात 16 हजार लोकांवर कारवाई तर 28 लाख दंड आकारण्यात आल्याची माहिती जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितलं.

एसपी आणि कलेक्टर साहेबांची रस्त्यावर उतरुन जनजागृती

मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग पाळणं गरजेचे असल्याचं सांगत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरुन नागरिकांमध्ये जनजागृती केली. शिवाय नागरिकांना कोरोनाचे सगळे नियम पाळण्याचं आवाहन करत जे नागिरक नियम पाळणार नाहीत, त्यांच्यावर कडक कारवाईचा इशारा देखील देण्यात आलाय.

लग्न सोहळ्यात 50 पेक्षा जास्त लोक नाही

लग्न समारंभात 50 पेक्षा जास्त गर्दी करू नये. त्यासाठी पोलिसांची मंगल कार्यालयात गस्त असणार आहे. गर्दी आढळल्यास यापुढील काही दिवस मंगल कार्यालय बंद केले जातील, असा इशाराही देण्यात आलाय.

(Nagar police Action Against who dance without masks)

हे ही वाचा :

नातीवर अत्याचार करणाऱ्या आजोबाला जन्मठेपेची शिक्षा

गळ्यात स्टीलचे पट्टे बांधून गुलाम बनवले, तरुणाने घरात 6 सेक्स स्लेव ठेवले, पोलिसांकडून सुटका

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.