बारामतीच्या पवार कुटुंबातील नवीन व्यक्तीची राजकारणात एन्ट्री

Sharad Pawar And Ajit Pawar | बारामती म्हणजे पवार कुटुंबियाचा गड आहे. या पवार कुटुंबियांमधील आणखी एक नवीन चेहरा राजकारणात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हा चेहरा राजकारणात सक्रीय झाला आहे. यामुळे अजित पवार यांना बळ मिळाले आहे.

बारामतीच्या पवार कुटुंबातील नवीन व्यक्तीची राजकारणात एन्ट्री
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 8:17 AM

प्रदीप कापसे, पुणे, दि.2 फेब्रुवारी 2024 | महाराष्ट्रातील राजकारणात बारामतीच्या पवार कुटुंबियांचे वर्चस्व आहे. पवार कुटुंबियांमधून शरद पवार राजकारणात आले. त्यानंतर अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांनीही राजकारण हे क्षेत्रच निवडले. शरद पवार आणि अजित पवार यांचा करिश्मा संपूर्ण महाराष्ट्रात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधून फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार वेगवेगळे झाले. परंतु दोन्ही नेते एकमेकांविरोधात राजकीय मैदानावर ठाण मांडून आहे. आता पवार कुटुंबातील आणखी एक चेहरा राजकारणात येत आहे. जय पवार यांना राजकारणात येण्यासाठी ग्रीन सिग्नल मिळाले आहे.

कोण आहेत जय पवार

अजित पवार यांचे कनिष्ठ पुत्र जय पवार राजकारणात येत आहे. अजित पवार यांचा मोठा मुलगा पार्थ पवार आधीच राजकारणात सक्रीय आहे. पार्थ पवार यांनी मावळ लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. परंतु त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. आता अजित पवार यांचा दुसरा मुलगा जय पवार राजकारणात पाऊल ठेवत आहे. त्यांना बारामतीच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी अजित पवारांकडून जय पवार यांना ग्रीन सिग्नल मिळाल्याची सूत्रांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

का झाले जय पवार सक्रीय

अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांनी राज्यभरात पक्ष वाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहे. यामुळे बारामतीच्या राजकारणात लक्ष घालण्यासाठी जय पवार सक्रीय होत आहे. गुरुवारी एका दिवसात बारामतीत ११ राष्ट्रवादी युवा शाखांच उद्घाटन त्यांनी केले. यापूर्वी कधीही ते राजकीय व्यासपीठावर आले नव्हते. गुरुवारी केलेल्या दौऱ्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटन मजबूत करायला जय पवार यांनीही सुरुवात केली आहे. यामुळे शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्याशी सामना करण्यासाठी अजित पवार यांना आणखी एक गडी मिळाला आहे.

बारामती म्हणजे पवार कुटुंबियाचा गड आहे. या पवार कुटुंबियांमधील आणखी एक नवीन चेहरा जय याच्या माध्यमातून राजकारणात येत आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी जय पवार राजकारणात सक्रीय झाले आहेत. यामुळे अजित पवार यांना बळ मिळाले आहे.

Non Stop LIVE Update
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले....
पृथ्वीराज चव्हाणांनी किती जागा मिळणार थेट आकडाच सांगितला, म्हणाले.....
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?
बीड लोकसभा मतदारसंघात काय घडतंय? फेर निवडणूक घेण्याची कुणाची मागणी?.
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं
ते ज्या ठिकाणी जातात तिथला उमेदवार पराभूत...; राज ठाकरेंना कोणी डिवचलं.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत जाहीर झालेली 'ही' निवडणूक पुढे ढकलली.
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?.
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?
आता अलकायदाचे लोक मातोश्रीत बिर्याणी..भाजप नेत्याचा कुणावर गंभीर आरोप?.
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्...
अमोल कोल्हेंचा विरोधकांवर हल्लाबोल, 500 रूपये एका मताची किंमत अन्....
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप
800 कोटींचे शिंदे लाभार्थी, हिशोब द्यावाच लागेल; राऊतांचा गंभीर आरोप.
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम
परवानगी फक्त 40 x 40 फूटांची पण होर्डिंगं लावलं..., कंपनीनं मोडला नियम.
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?
मुंबई, नाशिक शिक्षक-पदवीधर निवडणूक लांबणीवर जाणार? काय होतेय मागणी?.