नुसता संभ्रम, निलेश लंके नेमके कुणासोबत, शरद पवार की अजित पवार? काय घडलं?

निलेश लंके यांनी पुण्यात जावून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन झालं. आपण शरद पवार यांच्या विचारधारेवरच चालतो, असं निलेश लंके म्हणाले. पण आपण अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देवून शरद पवार गटात प्रवेश करतोय, असं निलेश लंके म्हणाले नाहीत. शरद पवार आणि निलेश लंके यांनी एकत्र पत्रकार परिषद घेतली. पण अजित पवार गटाला लंकेंनी सोडचिठ्ठी दिली का? यावर दोन्ही नेत्यांनी उत्तर देणं टाळलं. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये लंके नेमके कुणासोबत? असा संभ्रम निर्माण होण्याचं चिन्हं आहे.

नुसता संभ्रम, निलेश लंके नेमके कुणासोबत, शरद पवार की अजित पवार? काय घडलं?
Follow us
| Updated on: Mar 14, 2024 | 5:59 PM

पुणे | 14 मार्च 2024 :  महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडतंय? हे सर्वसामान्यांना समजणं आता अवघड होऊन बसलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे फूट पडलेली आहे. दोन्ही गटांची कायदेशीर लढाई पार पडली आहे. पण पवार काका-पुतण्यांची ही राजकीय लढाई त्यांच्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना गोत्यात आणताना दिसत आहे. कारण एकीकडे लोकप्रतिनिधी शरद पवार यांना आपण मानतो. त्यांचा आदेश आपण मानतो, असं म्हणतात. पण आपण अजित पवार गटाला सोडचिठ्ठी देतोय, असंही म्हणाताना दिसत नाहीयत. आम्ही ज्या लोकप्रतिनिधीची गोष्ट करतोय ते लोकप्रतिनिधी म्हणजे पारनेरचे आमदार निलेश लंके. निलेश लंके यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ पुस्तकाचं आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालत प्रकाशन पार पडलं. यावेळी शरद पवार यांनी निलेश लंके यांचं स्वागत केलं. पण शरद पवार आणि निलेश लंके या दोन्ही नेत्यांनी निलेश लंके यांनी अजित पवार गटाला सोडचिठ्ठी दिला का? या प्रश्नाचं उत्तर देणं टाळलं. त्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय? हे समजणं कठीण होऊन बसलं आहे.

निलेश लंके हे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांनी कोरोना काळात मोठं काम केलं. त्यांच्या कोरोना काळातील अनुभवाविषयी त्यांनी ‘मी अनुभवलेला कोविड’ अशा नावाचं पुस्तक लिहिलं आहे. शरद पवार यांच्या हस्ते त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. यावेळी शरद पवारांनी निलेश लंके यांना अहमदनगर लोकसभेच्या जागेतून उमेदवारी जाहीर करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. पण याबाबत दोन्ही नेत्यांनी काहीच भाष्य केलं नाही. याउलट आपल्या भेटीत राजकारणावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी प्रतिक्रिया या नेत्यांनी दिली.

निलेश लंके काय म्हणाले?

“देशामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या आणि विकासाच्या घटना घडल्या आहेत त्यामागे शरद पवार यांचा वाटा सिंहाचा आहे. त्यांचा देशाच्या विकासात मोठा वाटा आहे. मला माझी 2019 ची विधानसभेची निवडणूक आठवते. माझ्या तेव्हाच्या प्रचाराची सुरुवात शरद पवारांनी केली होती. कोरोना महामारीत भाऊ-भावाला विसरले. शरद पवारांची एक अदृश्य ताकद मला लाभली आहे. कोरोना काळात मी संघर्ष करत असताना ज्या घटना घडल्या त्या मी विसरु शकत नाही. त्या पुस्तकाचं नाव मी अनुभवलेला कोविड असं आहे. या पुस्तकात सर्व घटना लिहिल्या आहे. त्यांच्या हातून पुस्तकाचं प्रकाशन व्हावं अशी इच्छा होती. मी त्यांना विनंती केली आणि त्यांनी विनंती मान्य केली”, असं निलेश लंके म्हणाले.

“विचारधारा आणि पक्ष एकच आहे. मी शरद पवारांना कधी सोडलं नाही. माझ्या प्रत्येक कामात शरद पवार यांचा फोटो आहे. शरद पवार आमच्या हृदयात आहेत. खासदारकी आणि कुठल्या निवडणुकीबाबत आमची चर्चा झाली नाही”, असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलं.

“आज मी पुस्तक प्रकाशनासाठी आलेलो आहे. माझी अजित पवारांशी पक्ष सोडण्याबाबत प्रत्यक्ष चर्चाच नाही. त्या गोष्टीवर निष्फळ बोलण्यात अर्थ नाही. मी खासरकीतला सर्वात छोटा घटक आहे. वरिष्ठ असताना आपण शांत राहणं याला सुसंस्कृतपणा म्हणतात. आमच्या सर्वांचे सर्वस्व शरद पवार आहेत. शरद पवार सांगतील तोच आदेश मानेल. आम्ही विचारधारा सोडलेली नाही”, असं निलेश लंके म्हणाले.

शरद पवार काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पारनेरची जागा लढवायचा विचार आला त्यावेळेला पारनेरमध्ये आणखी आमचे काही सहकारी होते. पण मतदारसंघाची माहिती घेतल्यानंतर आम्ही निलेश लंके यांना उमेदवारी दिली. पारनेरमध्ये आम्ही सर्वांना संघटीत करण्याचं काम केलं. पारनेरने मला आणि माझ्या विचारांना पाठिंबा देण्याचं काम केलं. अशा ठिकाणी सामान्यांचं काम करणारा, सामान्य परिस्थितीतले निलेश लंके यांना संधी देण्याचा निर्णय घेतली. निलेश लंके यांनी अखंडपणे जनेची सेवा केली. त्यांची जनतेशी अतिशय प्रामाणिकपणे होती. त्यामुळे त्यांच्यासोबत आमची साथ कायमस्वरुपी आहे. मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. ते पक्षाच्या कार्यालयात आले आहेत. आम्ही निलेश लंके यांच्याकडे अतिशय कष्ट करणारे म्हणून पाहतो. आमच्यात राजकारणाची चर्चा झाली नाही”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

Non Stop LIVE Update
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?
माझ्याशी विश्वासघात केला की सत्यनाश, देवेंद्र फडणवीस काय नेमक म्हणाले?.
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.